अंतर्वस्त्रात डिव्हाईस-मायक्रोफोन, कॉपीसाठी दहा लाखांची 'डील'; वनविभागाच्या परीक्षेत धक्कादायक प्रकार

वनविभाग परीक्षा : चार दिवसांत तिसरी कारवाई झाल्याने उडाली खळबळ
Forest Department Exam
Forest Department Examesakal
Updated on
Summary

सांगली ते मिरज रोडवरील वसंतदादा पाटील इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट स्टडी अँड रिसर्च या कॉलेजमध्ये वनविभागाच्या शिपाई पदासाठीच्या भरतीचा पेपर कालपासून सुरू आहे.

सांगली : वनविभागाच्या परीक्षेत (Forest Department Exam) पुन्हा डिव्हाईसच्या (Device) माध्यमातून कॉपीचा प्रयत्न उघडकीस आला. वनविभागाच्या तपासणी पथकाने सतर्कतेने हा गंभीर प्रकार उघडकीस आला. गेल्या चार दिवसांतील ही तिसरी कारवाई असल्याने एकच खळबळ उडाली.

याप्रकरणी परीक्षार्थी उमेश संजय हुसे (आडगाव, छत्रपती संभाजीनगर), साहित्य पुरवठा करणारा बालाजी नामदेव तोगे (खोडेगाव, छत्रपती संभाजीनगर), एजंट राजू नांगरे आणि अजय नांगरे (दोघे काद्राबाद ता. जि. छत्रपती संभाजीनगर) अशा चौघांवर कारवाई करण्यात आली.

Forest Department Exam
INDIA Alliance : देशात 'इंडिया अलायन्स' भक्कम, शरद पवार सुद्धा..; उलट-सुलट चर्चा सुरू असताना काँग्रेस नेत्याचं मोठं विधान

विश्रामबाग पोलिस ठाण्यात याबाबत फिर्याद नोंद करण्यात आली. वसंतदादा पाटील इन्स्टिट्यूट कॉलेजमध्ये (Vasantdada Patil Institute College) हा प्रकार उघडकीस आला. दरम्यान, चार दिवसांपूर्वी कॉपी उघडकीस आली. त्यानंतर काल डमी उमेदवारास रंगेहाथ पकडण्यात आले. आता डिव्हाईसद्वारे कॉपीचा प्रकार उघडकीस आला.

या साऱ्यात छत्रपती संभाजीनगर कनेक्शन उघडकीस आले आहे. यामागे मोठे रॅकेट असण्याची शक्यता वर्तवण्यात आली असून विश्रामबाग पोलिस त्या अनुषंगाने तपास करत आहेत. याबाबत मिळालेली माहिती अशी की, वनरक्षक पदासाठी ऑनलाइन परीक्षा सुरू आहेत.

सांगली ते मिरज रोडवरील वसंतदादा पाटील इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट स्टडी अँड रिसर्च या कॉलेजमध्ये वनविभागाच्या शिपाई पदासाठीच्या भरतीचा पेपर कालपासून सुरू आहे. दुपारी पेपर सुरू होण्यापूर्वी टीसीएस कंपनीमार्फत तपासणी करण्यात आली. त्यावेळी परीक्षार्थी उमेश हुसे याच्यावर संशय आला. त्यानंतर पथकाने तपासणी केली.

Forest Department Exam
Kolhapur : शाळेतलं भांडण घरापर्यंत; पालकांमध्ये तुफान हाणामारी, हल्ल्यात एकाचा मृत्यू

त्यावेळी त्याच्या अंतर्वस्त्रात एका कम्युनिकेशन डिव्हाईस, मायक्रोफोन मिळून आला. हे साहित्य कॉपीसाठी बालाजी तोगे याने दिल्याचे सांगितले. त्यानुसार दोघांना ताब्यात घेण्यात आले. सखोल चौकशी केली असता एजंट राजू नांगरे आणि अजय नांगरे यांची नावे निष्पन्न झाली. त्याअनुषंगाने त्यांच्यावरही कारवाई करण्यात आली.

दरम्यान, गेल्या चार दिवसांतील ही तिसरी कारवाई झाल्याने खळबळ उडाली. मुख्य वनसंरक्षक रामानुजम, उपवनसंरक्षक नीता कट्टे यांच्या नेतृत्वाखाली वनक्षेत्रपाल युवराज पाटील, दादा भाजबळकर व खासगी सुरक्षा रक्षकांच्या मदतीने ही कारवाई करण्यात आली. आता पुन्हा सुरक्षा यंत्रणा ‘अलर्ट’ करण्यात आली असून उमेदवारांची काटेकोर तपासणी करण्यात येत आहे.

Forest Department Exam
कोल्हापूर रेल्वे स्थानकात 'बॉम्ब'; संपूर्ण यंत्रणा हादरली; पोलिसांनी 'ती' बॅग बाहेर आणली अन् बॉम्ब..

कॉपीसाठी दहा लाखांची ‘डील’

वनविभागाच्या परीक्षेत अत्याधुनिक डिव्हाईसद्वारे कॉपीचा प्रकार उघडकीस आला. नंतर सखोल तपास केल्यानंतर एजंट राजू नांगरे व अजय नांगरे, बालाजी तोगे यांनी संगनमताने कॉपीसाठी मदत करणार असल्याचे परीक्षार्थी हुसे याने कबुली दिली. त्या मोबदल्यात दहा लाख रुपयांची डील ठरवण्यात आली होती. परीक्षेनंतर हे पैसे दिले जाणार होते. छत्रपती संभाजीनगर येथील कनेक्शन वारंवार उघडकीस आल्याने मोठे रॅकेट यानिमित्ताने समोर येत आहे. याच्या मुळापर्यंत पोलिस जाणार का, असा सवाल उपस्थित होतोय.

Forest Department Exam
Sangli Crime : धक्कादायक! पतीच्या निधनानंतर पत्नीनं घेतला गळफास, आत्महत्येमुळं परिसरात खळबळ

कडक सुरक्षा यंत्रणा हवीच : परीक्षार्थी

सरकारी नोकरीसाठी जीवाचे रान करून आम्ही वर्षभर अभ्यास आणि मैदानी सराव करत आहोत. कॉपी, डमी उमेदवार अशांमुळे अभ्यास करणाऱ्या मुलांच्या भविष्याचाही प्रश्‍न निर्माण होऊ शकतो. तेव्हा परीक्षा केंद्रावर कडक सुरक्षा यंत्रणेत तपासणी झाली पाहिजे, असे मत एका परीक्षार्थीने व्यक्त केले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()