पुणे : देशातील विद्यापीठे, वरिष्ठ महाविद्यालये यांमध्ये सहाय्यक प्राध्यापक पदासाठी आवश्यक असलेल्या ‘यूजीसी नेट’ परीक्षेची प्रवेशपत्रे (ॲडमिट कार्ड) उपलब्ध झाली आहे. येत्या ९ जुलै रोजी होणारी परीक्षा देणाऱ्या उमेदवारांना ही प्रवेशपत्रे ‘https://ugcnet.nta.nic.in/’ या अधिकृत संकेतस्थळावरून डाऊनलोड करता येणार आहेत. विद्यापीठ अनुदान आयोगाच्या (यूजीसी) वतीने ही ‘राष्ट्रीय पात्रता परीक्षा’ (यूजीसी नेट) नॅशनल टेस्टिंग एजन्सीमार्फत (एनटीए) घेण्यात येते. ही परीक्षा वर्षातून दोन वेळा घेतली जाते. मात्र, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर डिसेंबर २०२१ची परीक्षा पुढे ढकलण्यात आली होती. त्यामुळे या परीक्षांच्या सत्रातील सातत्य कायम ठेवण्यासाठी डिसेंबर २०२१ आणि जून २०२२ ची परीक्षा एकत्रितरीत्या घेतली जाणार आहे.
त्यानुसार ९, ११ आणि १२ जुलै आणि १२, १३, आणि १४ ऑगस्ट २०२२ दरम्यान ही परीक्षा होणार आहे. त्यातील ९ जुलै रोजी होणाऱ्या परीक्षेची प्रवेशपत्रे उमेदवारांसाठी संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आली आहे. तर ११ आणि १२ जुलै रोजी होणाऱ्या परीक्षेसाठीची प्रवेशपत्रे परीक्षार्थींना लवकरच उपलब्ध करून देण्यात येतील, असे ‘एनटीए’ने स्पष्ट केले आहे.
केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत (सीबीएसई) ही नेट परीक्षा २०१८पर्यंत घेण्यात येत होती. परंतु त्यानंतर ही परीक्षा राष्ट्रीय टेस्टिंग एजन्सीमार्फत घेण्यात येते. जवळपास ८४ विषयांसाठी होणारी ही परीक्षा देशातील ९१ शहरांमध्ये घेण्यात येते. देशातील विद्यापीठे, वरिष्ठ महाविद्यालयातील सहाय्यक प्राध्यापक पदासाठी आणि ज्युनिअर रिसर्च फेलोशिप ॲण्ड असिस्टंट प्रोफेसर’ या पदासाठी पात्र ठरण्यासाठी ही परीक्षा घेतली जाते.
अधिक माहितीसाठी संकेतस्थळ
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.