परदेशी शिकताना : अनुभव आणि कौशल्यविकासाची उच्च शिक्षणात गरज

शिक्षण क्षेत्रातील सामाजिक व आर्थिक दरी, जनजागृतीचा अभाव, योग्य मार्गदर्शन नसणे
education
educationsakal
Updated on

ॲड. प्रवीण निकम

शिक्षण हा जीवनाभिमुख असा प्रवाही प्रवास आहे. विशिष्ट विषयात पदवी संपादन केल्यानंतर उच्च शिक्षण घ्यावे की नोकरीचा शोध घ्यावा? या संभ्रमात विद्यार्थी असतात. या प्रश्नांचे उत्तर शोधण्यातच अर्धे वर्षे निघून जातं. एखाद्या ठिकाणी नोकरीसाठी मुलाखतीला गेल्यास अनुभव नसल्याने नकार दर्शविला जातो. पुन्हा नवा विचारांचा गोंधळ उडतो. या संपूर्ण पातळीवर भविष्यातील अंदाज बांधत विद्यार्थी जगत असतो.

शिक्षण आणि कौशल्य विकसन, कामाचा अनुभव असे काही स्वतंत्र भाग तयार झाले तरी शिक्षणावर कामातील अनुभव अवलंबून असतो.‌ तसेच कामाच्या अनुभवांवर शिक्षण अवलंबून असते.‌ दोन्ही समांतर पातळीवरच्या बाबी आहेत. शिक्षण अर्थपूर्ण होत नाही तोवर त्याचे मोल उंचवणार नाही. त्यामुळे, महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना विद्यार्थ्यांनी आवडत्या क्षेत्रातील कामाचा अनुभव घेणे आवश्यक आहे. अशा गोष्टी सर्रासपणे दिसून येत नाही.

कारण, शिक्षण क्षेत्रातील सामाजिक व आर्थिक दरी, जनजागृतीचा अभाव, योग्य मार्गदर्शन नसणे हे यामागील मुख्य कारण आहे. तळागाळातील, ग्रामीण भागातील मुलांना ठरावीक शिक्षण पूर्ण झाल्यानंतर पूर्णवेळ नोकरी करणे ही परिस्थितीची गरज असते. यामुळे विद्यार्थी उच्च शिक्षणाकडे वळत नाही. उच्च शिक्षण घेतल्यास अधिक कामाच्या चांगल्या संधी उपलब्ध होतील. हा विचार रुजणे गरजेचे आहे.

education
New Education Policy : नवीन शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी; उमवि विद्या परिषद निर्णय

यावर उपाय म्हणून महाविद्यालयीन शिक्षण घेतानाच कौशल्य व रोजगारनिर्मितीचा पाया मजबूत करणे आवश्यक आहे. वाढत्या स्पर्धेमुळे बेरोजगारीचे प्रमाण अधिकाधिक वाढत आहे. या वातावरणात वावरताना लवकर चांगल्या नोकरीच्या संधी उपलब्ध होत नाही. त्यामुळे त्या-त्या क्षेत्रातील कामाचा किमान अनुभव आणि आवश्यक कौशल्ये असणे गरजेचे आहे. परदेशातील अभ्यास पद्धतीचा विचार केल्यास अनेक विद्यार्थ्यांसाठी शिक्षण घेणे आणि अर्धवेळ नोकरी घेणे हा अनुभव फायद्याचा असतो.

अर्धवेळ नोकरी केल्याने विद्यार्थ्यांना त्यांच्या आर्थिक स्थितीत स्थिरता आणि अनुभव मिळू शकतो. ते त्यांना अधिक तणावमुक्त जीवनानुभव देतात. अनेक विद्यार्थ्यांना त्यांच्या कामाच्या जबाबदाऱ्या आणि अभ्यासक्रम यातील योग्य नियोजन नसल्याने व अक्षमतेमुळे तणाव आणि बर्नआऊटचा अनुभव येतो. तसेच भारतातही उच्च शिक्षण घेत असताना अर्धवेळ नोकरी व इंटर्नशिपसारखे पर्याय उपलब्ध आहेत. त्यातून विद्यार्थ्यांना स्व-जाणीव, त्या क्षेत्रातील अनुभव व कामाचा आवाका आणि इतर संधी उपलब्ध होतात‌.

education
Education Department: तर गंभीर परिणामास आपण जबाबदार राहाल.. शिक्षक आमदार आसगावकरांनी दिला आंदोलनाचा इशारा

यात विद्यार्थी अनेक जबाबदाऱ्या असतात, जसे की वर्गात उपस्थित राहणे, असाइनमेंट्स पूर्ण करणे आणि परीक्षांचा अभ्यास करणे. या सगळ्यात इंटर्नशिप, अर्धवेळ नोकरीची वाट धरणे यागोष्टी आव्हानात्मक बनवू शकतात. अभ्यास व कामांना प्राधान्य देण्यासाठी ‘टू-डू लिस्ट’ ही पद्धत योग्य आहे. तुम्‍हाला पूर्ण करण्‍याची आवश्‍यकता असलेली सर्व कामांची यादी करून दिवसाची सुरुवात करा. नंतर कामाचा प्राधान्यक्रम ठरवा. यातही आऊटडोअर काम केल्यावर आपल्याला अधिक अनुभवही येतो आणि ओळखीही होतात.

education
Girls education : उच्च शिक्षणात मुलींच्या १०० टक्के शुल्काची प्रतिपूर्ती राज्याला परवडणारी - चंद्रकांत पाटील

संबंधित क्षेत्रातील नावाजलेल्या कंपनीत, संस्थेत इंटर्नशिप केल्यास करिअरला चांगलीच दिशा मिळते. आता या संधी कुठे उपलब्ध असतात? तर खासगी कंपन्या, संस्था, शासकीय विभाग ठरावीक कालावधीसाठी इंटर्नशिप व अर्धवेळ कामाचा अनुभव घेण्यासाठी संधी देते. काही विद्यापीठे अशा संधी उपलब्ध करून देतात. परदेशात याचे अधिक प्रमाण दिसून येते. यामुळे तुमच्यातील आत्मविश्वास, नेतृत्वगुण कौशल्य आणि जीवन कौशल्ये विकास अधिक होऊन अभ्यासाला व कामाला नवा मार्ग गवसतो.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.