AFCAT 2021 Notification : भारतीय वायुसेनेतर्फे घेण्यात येणाऱ्या हवाई दलाच्या कॉमन अॅडमिशन टेस्टची (Common Admission Test) (एएफसीएटी) तयारी करणार्या उमेदवारांसाठी ही महत्वाची बातमी! भारतीय हवाई दलाने (आयएएफ) फ्लाइंग ब्रांच आणि ग्राऊंड ड्युटी (Technical and non-technical) शाखेत कमिश्नर ऑफिसर या पदाकरिता वर्षाकाठी दोनदा एअरफोर्स कॉमन एडमिशन टेस्ट (एएफसीएट बॅच 02/2021) आयोजित केली होती. त्यासाठी अधिसूचनाही जारी केली आहे. एएफ बॅचच्या (02/2021) आयएएफच्या अधिसूचनेनुसार, हवाई दलाची संयुक्त प्रवेश परीक्षा 2021 जुलैपासून सुरू होणार असून एकूण 334 रिक्त पदांसाठी ही भरती केली जाणार आहे. (afcat-2021-notification-batch-02-2021-out-for-334-vacancies-apply-online-at-afcat-cdac-in)
भारतीय वायुसेनेतर्फे घेण्यात येणाऱ्या हवाई दलाच्या कॉमन अॅडमिशन टेस्टची (AFCAT) तयारी करणार्या उमेदवारांसाठी ही महत्वाची बातमी!
अर्ज भरण्यास 1 जूनपासून प्रारंभ
एएफकॅट बॅचसाठी अर्ज करण्यास इच्छुक असलेल्या उमेदवारांनी एअरफोर्सच्या वेबसाइटवर careerindianairforce.cdac.in किंवा afcat.cdac.in आपला अर्ज ऑनलाइन पध्दतीने भरु शकता. एएफकॅट बॅच 02/2021 अर्जाची प्रक्रिया 1 जूनपासून सुरू होणार असून उमेदवार 30 जून 2021 पर्यंत एएफकॅट बॅच 02/2021 अर्ज ऑनलाइन दाखल करू शकतात. दरम्यान, उमेदवारांना ऑनलाइन अर्ज भरताना 250 रुपये अर्ज फी भरावी लागणार आहे.
कोण अर्ज करू शकेल?
(एएफकॅट बॅच 02/2021) हवाई दलाच्या सूचनेनुसार, 20 ते 24 वर्षे वयोगटातील उमेदवार 1 जुलै 2022 पर्यंत अर्ज करू शकतात. म्हणजे, त्यांचा जन्म 2 जुलै 1998 ते 1 जुलै 2002 दरम्यान असावा. त्याचबरोबर एएफकॅट ड्यूटी शाखेची वयोमर्यादा 20 ते 26 वर्षे आहे. वयोमर्यादेबरोबरच उमेदवारांना शैक्षणिक पात्रता आणि शारीरिक निकषांची पूर्तता करावी लागणार आहे.
afcat 2021 notification batch 02 2021 out for 334 vacancies apply online at afcat cdac in
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.