पुणे : भारतीय हवाईदलातर्फे घेण्यात येणाऱ्या सामाईक प्रवेश परीक्षेच्या (एएफकॅट) नोंदणी प्रक्रियेला सुरुवात झाली असून येत्या १ डिसेंबरपासून ऑनलाइन अर्ज प्रक्रियेला सुरुवात होणार आहे. ही प्रवेश परीक्षा पुरुष व महिला उमेदवारांसाठी असून याद्वारे हवाईदलाच्या विविध विभागात अधिकारी म्हणून काम करण्याची संधी तरुणांना मिळणार आहे.
एएफकॅट प्रवेश प्रक्रिये अंतर्गत एकूण ३१७ जागा राखीव ठेवण्यात आल्या आहेत. त्यामध्ये पुरुष उमेदवारांसाठी २७५ तर, महिला उमेदवारांसाठी ४२ इतक्या जागा ठेवण्यात आल्या आहेत. या प्रवेश प्रक्रियेच्या माध्यमातून फ्लाइंग, ग्राउंड ड्यूटीमध्ये, तांत्रिक सारख्या विविध विभागात उमेदवारांची निवड केली जाणार आहे.
यामध्ये लेखी परीक्षा, एअरफोर्स सिलेक्शन बोर्डाच्या मुलाखती (एएफएसबी) त्यानंतर वैद्यकीय तपासणी अशा प्रकारे ही प्रवेश प्रक्रिया पार पडले. या प्रक्रियेतून निवड झालेल्या उमेदवारांना पुढील प्रशिक्षणासाठी तेलंगणातील दुंडीगल येथील एअरफोर्स ॲकॅडमीमध्ये पाठविले जाणार आहे. प्रशिक्षण पूर्ण झाल्यावर हे उमेदवार अधिकारी म्हणून भारतीय हवाईदलात सेवा कार्य बजावतील.
यामध्ये फ्लाइंग विभागासाठी वयोमर्यादा २० ते २४ तर ग्राउंड ड्यूटीसाठी उमेदवारांची वयोमर्यादा ही २० ते २६ वर्षे इतकी ठेवण्यात आली आहे. त्याचबरोबर विविध शैक्षणिक पात्रता देखील ठेवण्यात आली आहे. इच्छुक उमेदवारांनी याबाबतच्या अधिक माहितीसाठी तसेच अर्ज करण्यासाठी afcat.cdac.in या अधिकृत संकेतस्थळाचा वापर करावा. उमेदवारांना १ ते ३० डिसेंबर २०२३ पर्यंत अर्ज करता येईल.
- सर्वात प्रथम afcat.cdac.in या अधिकृत संकेतस्थळावर जावा
- होम पेजवर ‘IAF AFCAT 2024’ या लिंकवर क्लिक करा
- त्यानंतर नोंदणीचा अर्ज येईल, त्यामध्ये माहिती भरावी
- आवश्यक ते कागदपत्रे अपलोड करून तो सबमीट करा
- तसेच अर्जाची प्रिंट काढा
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.