Job Opportunities : 'हा' कोर्स केल्यानंतर थेट नासामध्ये नोकरीची संधी, पगारही दहा लाख...

आज आम्ही तुम्हाला उत्तम करियर संधी असणाऱ्या कोर्सची माहिती सांगणार आहोत
Job Opportunities
Job Opportunities esakal
Updated on

Job Opportunities : एकीकडे लोकांच्या हातच्या नोकऱ्या गेल्याने तरुणांमध्ये करियर क्षेत्र निवडीबाबत मोठा संभ्रम निर्माण झालाय. तर दुसरीकडे दहावीच्या परीक्षेला सुरुवात झाली असून परीक्षा संपताच या विद्यार्थ्यांना सुद्धा पुढे कुठले क्षेत्र निवडावे याबाबत प्रश्न पडतील तेव्हा आज आम्ही तुम्हाला उत्तम करियर संधी असणाऱ्या कोर्सची माहिती सांगणार आहोत. जेणेकरून पुढचे क्षेत्र निवड्यास तुम्हाला मदत होईल.

अनेक मुले दहावीनंतर अभियांत्रिकी शिक्षण घेण्याच्या अनुशंगाने दहावीनंतर क्लासेस लावतात. अभियांत्रिकीमध्येच एक शाखा आहे, ती म्हणजे वैमानिक अभियांत्रिकीची. या शाखेत प्रवेश घेतल्यास तुमचे भविष्य इतर क्षेत्रातील अभियंत्यांपेक्षा चांगले होईल. सर्वात मोठी गोष्ट म्हणजे जेव्हा तुम्ही अॅरोनॉटिकल इंजिनिअरचे शिक्षण घेतल्यानंतर नासासारखी वैज्ञानिक संस्था तुम्हाला लगेच नोकरी देऊ शकते.

Aeronautical Engineering बाबत सविस्तर जाणून घ्या

नोकरीच्या उत्तम संधी असल्या तरी हे क्षेत्र अभियांत्रिकी क्षेत्रातील सर्वात कठीण क्षेत्र मानले जाते. त्यामुळे बरेच विद्यार्थी या क्षेत्रात येण्यास घाबरतात. तुम्ही एकदा अॅरोनॉटिकल इंजिनीअरिंग केले की तुमच्यासाठी भविष्यात अनेक नोकऱ्या उपलब्ध आहेत. अॅरोनॉटिकल नॉटिकल इंजिनीअरिंगची पदवी घेत असलेले विद्यार्थी अवकाश संशोधन, संरक्षण तंत्रज्ञान आणि क्षेपणास्त्रे तसेच लष्करी विमानांची निर्मिती करण्याचे शिक्षण घेतात.

Aeronautical Engineering साठी लागणारी पात्रता

तुम्हाला अॅरोनॉटिकल इंजिनीअरिंग करायचे असेल तर ते पदवी आणि पदव्युत्तर तसेच डॉक्टरेट स्तरावर करता येते. पदवी स्तरावर वैमानिक अभियांत्रिकी अभ्यासक्रम करण्यासाठी विद्यार्थ्याने बारावीत भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र आणि गणित या विषयात किमान 50 ते 60 टक्के गुणांसह बारावी उत्तीर्ण केलेली असावी.

दुसरीकडे जर तुम्हाला अॅरोनॉटिकल इंजिनीअरिंगमध्ये पोस्ट ग्रॅज्युएशन करायचे असेल तर तुम्हाला पदवीधर असणे आवश्यक आहे. देशातील अव्वल वैमानिक अभियांत्रिकी संस्था पोस्ट ग्रॅज्युएशनसाठी प्रवेश परीक्षा घेतात आणि ती प्रवेश परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतरच तुम्हाला गुणवत्तेनुसार कोणत्याही महाविद्यालयात प्रवेश मिळेल.

Job Opportunities
BSF Job : बीएसएफमध्ये मोठी भरती; १०वी उत्तीर्णांना मिळणार संधी

नोकरीची संधी

अॅरोनॉटिकल इंजिनिअर्सना भारतातील आणि परदेशातील अनेक खासगी विमान कंपन्यांमध्ये मिळते नोकरीची संधी.

१) नॅशनल अॅरोनॉटिकल लॅबमध्ये संरक्षण मंत्रालयाच्या अनेक प्रकल्पांमध्ये, नागरी विमान वाहतूक विभागात, इस्रो, हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड सारख्या प्रतिष्ठित संस्थांमध्ये आणि अगदी नासामध्ये उत्कृष्ट नोकऱ्या मिळतात.

२) सर्वात मोठी गोष्ट म्हणजे जर तुम्हाला नासा सारख्या संस्थेत नोकरी मिळाली तर तुमचा सुरूवातीचा वार्षिक पगार 12 ते 15 लाख रुपये असू शकतो. (Job Opportunity)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.