Agniveer : अग्निवीरांसाठी महत्त्वाची बातमी; आता BSF मध्ये मिळणार 10 टक्के आरक्षण, वयोमर्यादेतही सूट

केंद्र सरकारनं (Central Government) अग्निवीरांबाबत आज आणखी एक मोठी घोषणा केलीये.
MHA Announcement On Agniveers
MHA Announcement On Agniveersesakal
Updated on
Summary

सरकारनं बीएसएफमधील रिक्त पदांवर माजी अग्निवीर जवानांसाठी 10 टक्के आरक्षण (BSF Reservation) जाहीर केलं आहे.

MHA Announcement On Agniveers : केंद्र सरकारनं (Central Government) अग्निवीरांबाबत आज आणखी एक मोठी घोषणा केलीये.

सरकारनं बीएसएफमधील रिक्त पदांवर माजी अग्निवीर जवानांसाठी 10 टक्के आरक्षण (BSF Reservation) जाहीर केलं आहे. यासोबतच, उच्च वयोमर्यादेच्या निकषांमध्येही शिथिलता जाहीर करण्यात आली आहे.

दरम्यान, ते (अग्निवीर) पहिल्या बॅचचा किंवा त्यानंतरच्या बॅचेसचा भाग आहेत की नाही यावर वयाची सवलत अवलंबून असणार आहे. गृह मंत्रालयानं 6 मार्चला अधिसूचनेद्वारे याची घोषणा केली आहे.

MHA Announcement On Agniveers
BJP News : मोदींचं लक्ष असलेल्या राज्यात भाजपला मोठा धक्का; 'या' बड्या नेत्यानं केला काँग्रेसमध्ये प्रवेश

गृह मंत्रालयाकडून अधिसूचना जारी

गृह मंत्रालयानं (MHA) जारी केलेल्या अधिसूचनेद्वारे, सीमा सुरक्षा दल कायदा 1968 (1968 मधील 47) च्या कलम 141 मधील उप-कलम (2) खंड (B) आणि (C) द्वारे प्रदान केलेल्या अधिकारांचा वापर करून याची घोषणा करण्यात आली आहे.

MHA Announcement On Agniveers
Xi Jinping : बलाढ्य चीनची ताकद आणखी वाढणार; सलग तिसऱ्यांदा शी जिनपिंग बनले 'राष्ट्राध्यक्ष'

नियमांमध्ये सुधारणा

केंद्र सरकारनं अधिकारांचा वापर करून 2023 च्या भरतीसाठी सीमा सुरक्षा दल, जनरल ड्युटी कॅडर भरती नियम 2015 मध्ये सुधारणा जाहीर केली आहे. हा नियम 9 मार्चपासून लागू झाला आहे.

MHA Announcement On Agniveers
Germany Shooting : चर्चमध्ये अंदाधुंद गोळीबार; हल्ल्यात सात ठार, आठ जण जखमी

हवालदार पदासाठी वयात सवलत

केंद्र सरकारनं जाहीर केलंय की, कॉन्स्टेबल पदाशी संबंधित भागाचे नियम बदलले जातील आणि उच्च वयोमर्यादेत शिथिलतेच्या नोट्स समाविष्ट केल्या जातील. अग्निवीरांच्या पहिल्या तुकडीच्या उमेदवारांना पाच वर्षांपर्यंत आणि माजी अग्निवीरांच्या इतर सर्व तुकड्यांच्या बाबतीत तीन वर्षांपर्यंत सूट दिली जाईल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.