गणेश रेशवाल
अनेक विद्यार्थी पदवीला जाईपर्यंत त्यांना कळत नाही, की आयुष्यात नेमकं काय करावं? अशा परिस्थितीत शाळेत असतानाच जर एआयच्या मदतीने मुलांमधील प्रज्ञा आणि प्रतिभा योग्य वयात फुलत असेल आणि ती उपयोगात आणता येत असेल, तर हे एआय टूल मदतीला घेणे योग्य ठरेल. मुलांच्या कल्पनाशक्तीला चालना देणारे, त्यांच्या सर्जनशील वैचारिक प्रक्रियेत मदत करणारे आणि विविध विषयांमध्ये नवीन दृष्टिकोन प्रदान करणारे साधन म्हणून कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजे एआय वापरले जातेय. ‘एआय’ माणसातली सर्जनशीलता लक्षणीयरीत्या वाढवू शकते आणि सर्जनशीलता हीच अनेक प्रश्नांची उत्तरे सापडण्याची गुरुकिल्ली आहे. त्यामुळे एआय सर्जनशीलतेला कशी चालना देऊ शकते आणि ‘एआय’च्या माध्यमातून प्रतिभेला चालना कशी मिळू शकते ते आपण पाहणार आहोत.