एअर इंडिया एअरपोर्ट सर्व्हिस लिमिटेड ( AIASL) मध्ये नोकरीसाठी २७७ पदांवर भरती करायची आहे. हँडीमन, सीनियर कस्टमर एजंट/ग्राहक एजंट/ज्युनियर कस्टमर एजंट, रॅम्प सर्व्हिस एजंट/युटिलिटी एजंट कम रॅम्प ड्रायव्हर आदी पदे भरायची आहेत. एकूण २७७ जागा असून ही पदे कंत्राटी पद्धतीने भरायची आहेत. ग्राउंड स्टाफच्या पदांसाठी २१ मार्चपर्यंत इमेलने अर्ज करायचा आहे. एअर इंडिया एअरपोर्ट सर्व्हिस लिमिटेड (एआयएएसएल) पूर्वी एअर इंडिया ट्रान्सपोर्ट सर्व्हिस लिमिटेड म्हणून ओळखले जात असे.
डॅप्युटी टर्मिनल मॅनेजर - १
डॅप्युटी ऑफिसर रॅंप- ३
ऑफिसर एडमिन- ४
ऑफिसर फायनान्स -५
ज्युनिअर एक्झिक्युटिव्ह टेक्निकल - २
ज्युनिअर कार्यकारी Pax -८
कस्टमर एजंट- ३९
रॅंप सर्व्हिस एजंट- २४
हॅंडीमॅन - १७७
डॅप्युटी टर्मिनल मॅनेजर - पदवीधर असण्याबरोबरच १८ वर्षांचा अनुभव गरजेचा.
डॅप्युटी ऑफिसर रॅंप- पदवीधर असण्याबरोबरच १२ वर्षांचा अनुभव गरजेचा.
ज्युनिअर एक्झिक्युटिव्ह - पदवीधर असण्याबरोबरच ९ वर्षांचा अनुभव गरजेचा.
कस्टमर एजंट- सिनियर कस्टमर पदासाठी पदवीधर असण्याबरोबरच आयएटीएचा डिप्लोमा आवश्यक. तर ज्युनिअर कस्टमर एजंट पदासाठी १२ वी पास आणि एक वर्षाचा अनुभव गरजेचा
यूटिलिटी कम रॅंप ड्रायव्हर- दहावी पास असण्याबरोबरच जड वाहने चालविण्याच अनुभव गरजेचा.
ज्युनिअर एक्झिक्युटिव्ह टेक्निकल - मॅकेनिकल, ऑटोमोबाइल, प्रोडक्शन, इलेक्ट्रिकल, इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रॉनिक्स, इलेक्ट्रॉनिक्स आणि कम्युनिकेशन इंजिनियरिंग आदीपैकी एकात पदवीधर.
रॅंप सर्व्हिस एजंट- मॅकेनिकल, ऑटोमोबाईल, प्रोडक्शन, इलेक्ट्रॉनिक्स किंवा ऑटोमाबाईल इंजिनियरिंगमध्ये तीन वर्षांचा डिप्लोमा गरजेचा.
ऑफिसर एडमिन- एचआर किंवा पर्सनल मॅनेजमेंटमध्ये स्पेशलायजेशन तसेच एमबीएची पदवी.
ऑफिसर फायनान्स- इंटर चार्टड अकाऊंट किंवा फायनान्समध्ये एमबीए केलेले असावे.
उमेदवार http://www.aiasl.in या वेबसाईटवर अर्ज करू शकतात.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.