सणासुदीच्या काळात Amazon, Flipkart मध्ये मेगाभरती, ५ ते साडे पाच लाख नवीन जागा

डेटा रिटेल, ई-कॉमर्स, लॉजिस्टिक, वेअरहाउसिंग, बँकिंग आणि वित्तीय सेवा (BFSI) यांसारख्या क्षेत्रातील कंपन्यांना कर्मचाऱ्यांची गरज भासणार आहे.
recruitment
recruitmentgoogle
Updated on

मुंबई : या सणासुदीच्या हंगामात मोठ्या संख्येने तात्पुरत्या नोकऱ्या निर्माण होण्याची शक्यता आहे कारण सर्व उद्योगातील कंपन्या करोनानंतरच्या हंगामी खरेदीत अपेक्षित वाढ पूर्ण करण्यासाठी मनुष्यबळ वाढवत आहेत. ऑगस्ट ते नोव्हेंबर दरम्यान पाच ते साडेपाच लाख नवीन तात्पुरत्या नोकर्‍या निर्माण होण्याची शक्यता आहे.

डेटा रिटेल, ई-कॉमर्स, लॉजिस्टिक, वेअरहाउसिंग, बँकिंग आणि वित्तीय सेवा (BFSI) यांसारख्या क्षेत्रातील कंपन्यांना कर्मचाऱ्यांची गरज भासणार आहे. “कंपन्यांनी मनुष्यबळ बळकट करण्यासाठी तयारी सुरू केली आहे कारण त्यांना त्यांच्या ऑनलाइन आणि ऑफलाइन विक्रीत मोठी वाढ अपेक्षित आहे.

हा सणाचा हंगाम गेल्या तीन वर्षांतील पहिला असेल जेव्हा बहुतेक लोकसंख्येचे लसीकरण करण्यात आले आहे. कोविड-प्रेरित निर्बंध हटवण्यात आले आहेत, गतिशीलता सुधारली आहे आणि महासाथीची भीती कमी झाली आहे,” असे मॅनपॉवरग्रुप इंडियाचे विक्री, खाते व्यवस्थापन आणि जागतिक खात्यांचे वरिष्ठ संचालक आलोक कुमार म्हणाले.

recruitment
Army Recruitment : भारतीय सैन्यात नोकरीची संधी; मिळू शकतो १ लाख रुपये पगार

गेल्या वर्षीच्या सणासुदीच्या महिन्यांच्या तुलनेत सुमारे २०-२५% नोकऱ्यांची ही वाढ आहे. सुमारे 70% मागणी किंवा ३ लाख ५० हजार नवीन नोकर्‍या डिलिव्हरी, लॉजिस्टिक आणि वेअरहाउसिंग सेगमेंटमध्ये असण्याचा अंदाज आहे. Amazon, Shadowfax Technologies, Ecom Express, आणि Flipkart सारख्या कंपन्या स्थानिक पातळीवरील कर्मचाऱ्यांची फळी मजबूत करण्याच्या प्रयत्नात आहेत.

Shadowfax Technologies, जे Flipkart, Ajio, Zepto, Swiggy, Zomato आणि Domino's सारख्या ऑनलाइन मार्केटप्लेससह काम करते, पुढील तीन महिन्यांत 105,000 डिलिव्हरी एजंट्सची नियुक्ती करण्याची योजना आखत आहे.

"आम्ही फॅशन, कंझ्युमर इलेक्ट्रॉनिक्स/मोबाइल फोन, पुस्तके, किराणा सामान, अन्न, गृह फर्निशिंग आणि लहान मुलांच्या उत्पादनांसह विविध श्रेणींमधून चांगली मागण पाहात आहोत," असे शॅडोफॅक्सचे सह-संस्थापक आणि ऑपरेशन्सचे प्रमुख प्रहर्ष चंद्रा म्हणाले.

recruitment
Study Abroad : पदव्युत्तर शिक्षणाबाबत भारत-UK यांच्यात सामंजस्य करार

Ecom Express या सणासुदीच्या आधी घरपोच सुविधा आणि त्याच्या क्रमवारी केंद्रांवर सुमारे 55,000 लोकांना कंत्राटी नेमण्याची योजना आखत आहे. ही संख्या वर्षभरापूर्वी ३५ हजार होती.

“आमची नियुक्ती सर्व क्षेत्रांमध्ये केंद्रित केली जाईल आणि आम्हाला टियर III/IV शहरे आणि देशाच्या दुर्गम भागांतून मोठ्या प्रमाणात वाढ दिसून येत आहे,” असे इकॉम एक्सप्रेसचे मुख्य धोरण अधिकारी आशिष सिक्का म्हणाले.

Amazon India चे प्रवक्ते म्हणाले: "2021 मध्ये, आम्ही 110,000 पेक्षा जास्त हंगामी कामाच्या संधी निर्माण केल्या आहेत... या वर्षी देखील, आम्ही हंगामी सहयोगींचे स्वागत करू".

टीमलीज सर्व्हिसेसच्या सह-संस्थापक आणि कार्यकारी संचालक रितुपर्णा चक्रवर्ती म्हणाल्या, “ऑनलाइन शॉपिंगमध्ये वाढ करण्यासाठी नोकरभरतीत वाढ झाली आहे. त्याशिवाय, ऑनलाइन किरकोळ विक्रेते त्यांच्या द्रुत वाणिज्य उपक्रमांची मागणी पूर्ण करण्यासाठी कर्मचारी कंत्राटावर घेणे सुरू ठेवतील.

लास्ट माईल डिलिव्हरी व्यतिरिक्त, इतर उद्योग क्षेत्रांमध्ये मागणी असलेल्या तात्पुरत्या प्रोफाइलमध्ये ग्राहक सेवा अधिकारी, बिलिंग एक्झिक्युटिव्ह, वित्तपुरवठा आणि कर्ज अधिकारी आणि बॅक-एंड सपोर्ट यांचा समावेश होतो.

भारतातील सणांचा हंगाम ऑगस्टमध्ये रक्षाबंधन, जन्माष्टमी आणि गणेश चतुर्थीसह सुरू होतो आणि तो दुर्गापूजा/नवरात्री, दिवाळी आणि ख्रिसमसपर्यंत सुरू राहील.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.