इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग खुणावतंय

भारताने जगातील इलेक्ट्रिक वाहन क्षेत्रात अग्रगण्य बनण्यासाठी प्राधान्य दिले आहे. या क्षेत्रातील संधी जाणून घेऊयात...
Anjali Purohit writes career in Electrical engineering
Anjali Purohit writes career in Electrical engineeringsakal
Updated on
Summary

भारताने जगातील इलेक्ट्रिक वाहन क्षेत्रात अग्रगण्य बनण्यासाठी प्राधान्य दिले आहे. या क्षेत्रातील संधी जाणून घेऊयात...

- अंजली पुरोहित

भारताने जगातील इलेक्ट्रिक वाहन क्षेत्रात अग्रगण्य बनण्यासाठी प्राधान्य दिले आहे. या क्षेत्रातील संधी जाणून घेऊयात...

विद्युत अभियांत्रिकी म्हणजेच इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग ही अभियांत्रिकीतील मूलभूत शाखा आहे. इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग ही सर्व क्षेत्रांवर प्रभाव टाकणारी प्रगतशील अभियांत्रिकीची शाखा आहे. काळाची गरज ओळखून विद्युत अभियांत्रिकी फक्त पारंपरिक शाखा न राहता नावीन्यपूर्ण तंत्रज्ञानाची जोड असलेली, अखंड विकसित होत जाणारी अभियांत्रिकीच्या प्रमुख शाखांमधील एक शाखा आहे. भारत सरकारच्या डिजिटल इंडिया, मेक इन इंडिया या सारख्या भारताला प्रगत बनवणाऱ्या उपक्रमांमुळे तसेच उत्पादन क्षेत्र, वाहन उद्योग, अपारंपरिक ऊर्जास्रोत यांची निर्मिती व संशोधन यासारख्या क्षेत्रांतील घडामोडींमुळे विद्युत अभियंत्यांना प्रचंड मागणी व उद्योजक बनण्याच्या नवनवीन संधी उपलब्ध होणार आहेत.

वाढती लोकसंख्या, उद्योगधंदे, आधुनिक उपकरणांचा वापर व उत्पादन, कारखान्यातील यंत्रे व मशिनरी, शेती उद्योग, वैद्यकीय व्यवसाय, ऑटोमोबाईल, स्पेस ॲप्लिकेशन्स, रोबोटिक्स, ऑटोमेशन या व इतरही सर्व क्षेत्रात तंत्रज्ञान विकसित करण्याची मोठी संधी विद्युत अभियंत्यांना आहे. इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग ही अशीच मूलभूत तत्त्वांवर भर देणारी कोअर शाखा आहे. या शाखेची पाळेमुळे इतर शाखांमध्येही पसरली आहेत. त्यामुळेच या अभियांत्रिकीच्या शाखेकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलत आहे. इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग असे उच्चारताच डोळ्यासमोर येतात ते म्हणजे, इलेक्ट्रिसिटी, इलेक्ट्रिक मशिन, इलेक्ट्रोमॅग्नेटिझम यासारखे शब्द. काळाबरोबर या शाखेची यशस्वी वाटचाल व विकास सुरू आहे.

भविष्यातील संधी

साधारणपणे २०३०हे इलेक्ट्रिक वाहनांचे युग असेल. प्रदूषणापासून मुक्तता, पर्यावरण रक्षण, देशांतर्गंत सुरक्षा व उत्पादन क्षमतेला चालना यामुळे इलेक्ट्रिक वाहनांची निर्मिती तसेच खासगी वाहन व पब्लिक वाहतूक क्षेत्रांतील ३० टक्के बाजारपेठ काबीज करणे हे भारताचे उद्दिष्ट आहे. यामुळे इलेक्ट्रिक वाहने, हायब्रीड व्हेईकल्स अशा क्षेत्रात तंत्रज्ञान विकसित करण्याची व संशोधन करण्याची संधी विद्युत अभियंत्यांना उपलब्ध आहे. अपारंपरिक ऊर्जास्रोत निर्मिती, प्रचार व प्रसार यांचा कल्पकतेने वापर करून देशाला आर्थिकसंपन्न बनविण्यात इलेक्ट्रिक अभियंत्यांचा मोलाचा सहभाग असेल.

वेगाने चार्ज होणाऱ्या, दीर्घकाळ टिकणाऱ्या, अधिक क्षमतेच्या बॅटरीची निर्मिती व संशोधन हे विद्युत अभियंत्यांसमोर कायमच आव्हान असेल. संगणक प्रणालीचा वाढत वापर, स्वयंचलित वाहने, स्वयंचलित उद्योग प्रणाली व उत्पादन यंत्रणा, रोबोटिक्स, अवकाशयानाचे कक्षेतील नियंत्रण यासारख्या गोष्टींसाठी विद्युत अभियांत्रिकीतील कंट्रोल अभियंत्यांना वाव आहे. स्मार्ट ग्रीडसारखे शब्द आता सामान्य माणसाच्या ओळखीचे वाटू लागले आहेत. यामध्ये अपारंपरिक ऊर्जा, ऑटोमेशन, कम्युनिकेशन व माहिती तंत्रज्ञानाचा समावेश विद्युत निर्मितीपासून ते वितरणापर्यंत सर्व गोष्टींसाठी केला जातो. अखंडित विद्युत पॉवर, उच्च दर्जाची विद्युत निर्मिती व वितरण, स्वयं नियंत्रित विजेचा वापर व दुरुस्ती यासारखे आमूलाग्र बदल आधुनिक तंत्रज्ञानाने इलेक्ट्रिकल क्षेत्रात झाले आहेत व होत आहेत. कमी खर्चात चांगल्या दर्जाचे उत्पादन करणे, कामातील अचूकता व वेग वाढवण्यासाठी रोबोटिक्स व ऑटोमेशन हे शब्द उद्योगधंद्यात परवलीचे आहेत. विद्युत अभियंत्यांची या क्षेत्रातील कामगिरी उल्लेखनीय आहे.

रोजगाराच्या संधी

विद्युत अभियंत्यांना स्वयंरोजगाराबरोबर शासकीय, निमशासकीय, खासगी अशा अनेक क्षेत्रांत रोजगाराच्या मुबलक संधी उपलब्ध आहेत. भारतासह अमेरिका, कॅनडा, इंग्लंड, ऑस्ट्रेलिया, जर्मनीसारख्या नामांकित युनिव्हर्सिटीमध्ये पुढील शिक्षण, संशोधन तसेच करियरच्या संधी मुबलक प्रमाणात उपलब्ध आहेत. मल्टीडिसिप्लिनरी तंत्रज्ञान आत्मसात करणे व त्याचे अवलंबन करणे ही काळाची गरज ओळखणे गरजेचे आहे. विद्युत अभियांत्रिकीचे महत्त्व व गरज कायम असणार आहे. भविष्यात अभ्यासासाठी व संशोधनासाठी विद्युत अभियंत्यांना बराच वाव आहे. म्हणूनच विद्युतभियांत्रिकी शाखेची निवड गुणवान विद्यार्थी नक्कीच करतील.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()