- अंकित भार्गव
अनेक संस्था जागतिक स्तरावर काम करत असतात. त्या पार्श्वभूमीवर कृत्रिम बुद्धिमत्तेची (आर्टिफिशियल इंटेलिजन्स) भूमिका महत्त्वाची ठरते. पूर्वीच्या काळी केवळ काही तांत्रिक कारणांसाठी कृत्रिम बुद्धिमत्तेचा उपयोग केला जात असे, परंतु त्यानंतर विकसित झालेल्या संवाद समजू शकणाऱ्या (लँग्वेज लर्निंग मॉडेल आणि नॅचरल लँग्वेज प्रोसेसिंग) आणि वापरकर्त्यांकरिता सोप्या असणाऱ्या इंटरफेसेसमुळे आपल्या दैनंदिन व्यावसायिक जीवनातील कृत्रिम बुद्धिमत्तेच्या वापराचे महत्त्व लक्षणीयरित्या वाढले आहे.
‘ओपन एआय’चे चॅटजीपीटी, गुगलचे बार्ड, एआय आणि एमएल या तंत्रज्ञानाचा प्रत्येक कर्मचारी उपयोग करत आहे. तो कर्मचारी तांत्रिक क्षेत्रातील असो अथवा नसो परंतु अधिक परिणामकारक, कार्यक्षम आणि सर्वोत्तम परिणाम देण्यासाठी तो या तंत्रज्ञानाचा उपयोग करतो.
‘ओपन एआय’ संस्थेने मायक्रोसॉफ्टच्या सहयोगाने विकसित केलेले चॅटजीपीटी हे पहिल्या काही महत्त्वपूर्ण तंत्रज्ञानांपैकी एक आहे. याचा उपयोग तांत्रिक क्षेत्रात काम करत नसलेले लोकदेखील मोठ्या प्रमाणात करतात. यामुळे ‘एआय’ आणि ‘एमएल’ यांच्या वापरामध्ये क्रांती घडून आली आहे.
नॅचरल लँग्वेज प्रोसेसिंग आणि लँग्वेज लर्निंग मॉडेल यांचा समावेश असणाऱ्या चॅटजीपीटीच्या अत्यंत सोप्या इंटरफेसमुळे (फक्त एक प्रश्न विचारा आणि एक उत्तमपणे लिहिलेले, तयार उत्तर मिळवा.) प्रत्येक विभागाने चॅटजीपीटीचा उपयोग करणे सुरू केले आहे.
एवढंच नाही तर तुम्ही या तंत्रज्ञानाचा जितका जास्त वापर कराल तितकी त्याच्या उत्तरामध्ये अधिक अचूकता येईल. या तंत्रज्ञानाचा वापर शिकून घेणे आणि त्यानंतर त्याच्या साहाय्याने कामकाज करणे या संदर्भात आम्ही काम करत आहोत.
आपली कार्यक्षमता वाढवण्यासाठी खासगी संस्था आणि शासनाचे काही विभाग यांनी विविध पर्याय शोधण्यास सुरुवात केली आहे. बार्ड आणि चॅटजीपीटी यांच्यामध्ये साम्य असले तरी पुढील लेखांमध्ये चॅटजीपीटीचा विविध विभागांमध्ये कशा प्रकारे उपयोग करता येईल या विषयांची माहिती असेल.
अ) मनुष्यबळ विभाग - कर्मचाऱ्यांना आकर्षित करणे, भरती प्रक्रिया, नियुक्ती प्रक्रिया, रिटेन्शन आणि एंगेजमेंट, विकास, संस्थेतून बाहेर पडण्याच्या प्रक्रियेचे व्यवस्थापन
ब) ब्रँडींग आणि मार्केटिंग विभाग - कंटेंट रायटिंग, समाजमाध्यमांचे व्यवस्थापन, व्हिडिओ तयार करणे, प्रेझेंटेशन तयार करणे, संकेतस्थळ विकसित करणे इ.
क) विक्री विभाग - सीआरएम व्यवस्थापन, सेल्स फनेलिंग, विक्री संदर्भात संशोधन, स्पर्धकांविषयी संशोधन, विक्रीच्या संदर्भात संवाद, विक्रीचे विश्लेषण
ड) खरेदी विभाग - सप्लाय चेन मॅनेजमेंट, डिमांड अँटीसिपेशन, इन्वेन्टरी ऑप्टीमायझेशन, व्हेंडर परफॉर्मन्स मॅनेजमेंट
ई) माहिती तंत्रज्ञान विभाग - कोणत्याही भाषेमध्ये सॉफ्टवेअर कोडची निर्मिती, कोड कन्व्हर्जन, कोड डॉक्युमेंटेशन, टेस्ट केस जनरेशन, तांत्रिक साहाय्य, बग निश्चित करणे
फ) कायदा विभाग - कायदेविषयक संशोधन, कायदेविषयक कागदपत्रे तयार करणे, कायदेविषयक माहिती आणि विश्लेषण हे जग सातत्याने बदलत आहे आणि आपण बदलत्या जगाशी समन्वय साधला नाही आपले अस्तित्वच धोक्यात येईल.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.