करिअर अपडेट : स्पर्धा जिंकण्यासाठी ‘एआय’ आधारित मार्केटिंग

आपण टीव्ही, सोशल मीडिया, रेडिओ, वर्तमानपत्र यांमध्ये पाहत/ऐकत असलेल्या विविध उत्पादने किंवा सेवांच्या जाहिराती आपल्याला आवडतात की नाही?
artificial intelligence
artificial intelligencesakal
Updated on

- अंकित भार्गव

आपण टीव्ही, सोशल मीडिया, रेडिओ, वर्तमानपत्र यांमध्ये पाहत/ऐकत असलेल्या विविध उत्पादने किंवा सेवांच्या जाहिराती आपल्याला आवडतात की नाही? आपल्यापैकी काही जणांना मार्केटिंग आणि ब्रँडींग क्षेत्रामध्ये काम करायचे असल्यास, या क्षेत्राची मूलभूत समज असणे हे सोशल मीडियाचा प्रभाव असणाऱ्या या कालखंडामध्ये आवश्यक आहे. आपल्याला उपयोगी पडतील अशी काही ‘एआय’ टूल्स खालीलप्रमाणे.

अ) बाजारपेठेची माहिती घेणे

बार्ड किंवा चॅटजीपीटी वापरून आपले स्पर्धक, त्यांची कामगिरी आणि संपर्कयंत्रणा समजून घेता येते. एखाद्या बाबतीत आपली भूमिका ठरवताना आपल्या स्पर्धकाची संपर्कयंत्रणा समजून घेणे फायदेशीर ठरते. स्पर्धकांची बाजारपेठेतील विविध क्षेत्रातील कामगिरी समजून घेणे आवश्यक असते. त्याआधारे तुम्ही मार्केटिंगचे धोरण ठरवू शकता.

ब) कंटेंट राईटिंग

प्रत्येकालाच इंग्रजी भाषा चांगल्या प्रकारे अवगत असेल किंवा त्याला सर्व भाषांचे ज्ञान असेल हे शक्य नसते. आता चॅटजीपीटीच्या सहाय्याने तुमच्या मनातील विचारांना लेख, ब्लॉग, सोशल मीडिया पोस्ट्स, कविता इत्यादी स्वरूपात शब्दबद्ध करणे सोपे झाले आहे. ‘माझ्या आईसाठी १०० शब्दांमध्ये कविता लिहून देण्यात यावी’ (Write a poem of 100 words for my mother) अशी सूचना चॅटजीपीटीच्या माध्यमातून द्या आणि ती कविता ऐकवून तुम्ही निश्चितच एखादे बक्षीस मिळवाल.

चॅटजीपीटी हे इंग्रजी आणि जागतिक स्तरावरील अन्य भाषांमध्ये अचूकपणे काम करत असले तरी हिंदी आणि अन्य प्रादेशिक भारतीय भाषांमध्ये मात्र त्याच्याकडून चुका होतात. त्यामुळे चॅटजीपीटीचा उपयोग करून इंग्रजी भाषेमध्ये कंटेंट तयार करून तो गुगल ट्रान्सलेटच्या साहाय्याने मराठी किंवा कन्नड भाषेत भाषांतरित करण्यात यावा. असे असले तरी हा सर्व कंटेंट प्रसिद्ध करण्यापूर्वी एकदा तपासून घेतला पाहिजे.

क) सोशल मीडिया व्यवस्थापन

आपल्या ब्रँडसाठी सोशल मीडिया कॅलेंडर तयार करणे इथपासून ते दैनंदिन पोस्टसाठी कंटेंट लिहिणे, त्या कंटेंटला अनुसरून कॅन्व्हा किंवा बिंग इमेज जनरेटरच्या साहाय्याने ग्राफिक्स तयार करणे, हॅशटॅग लिहिणे अशा विविध कामांसाठी चॅटजीपीटीचा उपयोग करून तुमच्या ब्रँडची इतरांपेक्षा अधिक प्रभावीपणे प्रसिद्धी करू शकता.

ड) व्हिडिओ तयार करणे

चॅटजीपीटी किंवा बार्डचा उपयोग करून स्क्रीप्ट लिहिणे सोपे आहे. ‘एआय’वर आधारित काही व्हिडिओ जनरेटर्सचा उपयोग करून तुम्ही त्यांना स्क्रीप्ट दिल्यास ते तुमच्यासाठी व्हिडिओ तयार करतील. तरीदेखील यासंदर्भात एक दक्षता घेणे आवश्यक आहे. या ‘एआय’ टूल्सच्या डेटाबेसमधील बहुतांशी व्हिडिओ बाइट्सना जागतिक स्तरावरील संदर्भ असतात त्यांचा ‘भारतीय’ संदर्भात वापर करणे कठीण असते. तरीही, भारतीय डेटाबेस असलेल्या स्टॉक इमेजेस आणि व्हिडिओ कंपन्या त्यांचा स्टॉक या ‘एआय’ कंपन्यांना देऊ करतील असेही लवकरच घडू शकते.

ई) संकेतस्थळाचे विकसन

मार्केटिंग आणि कंटेंट राईटिंगच्या क्षेत्रामध्ये करणाऱ्यांसाठी सर्च इंजिन ऑप्टीमायझेशन महत्त्वाचे असे ‘फंक्शन’ आहे. सर्च इंजिनच्या माध्यमातून आपले उत्पादन अपेक्षित ग्राहकांपर्यंत पोहोचवण्यासाठी हे तंत्रज्ञान अत्यंत उपयुक्त ठरते. आपला कंटेंट चॅटजीपीटीला द्या आणि चॅटजीपीटीकडून तुम्हाला ‘एसईओ रेडी कंटेंट’ मिळेल. आपल्याला स्पर्धेमध्ये पुढे राहण्यासाठी योग्य ते हॅशटॅगही मिळतील.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()