Admission : केंद्रीय विद्यालयातील प्रवेश प्रक्रियेची घोषणा; २७ मार्चपासून ऑनलाईन अर्ज नोंदणी

केंद्रीय विद्यालयांतील इयत्ता पहिलीच्या प्रवेश प्रक्रियेची घोषणा करण्यात आली असून, २७ मार्चपासून पालकांना ऑनलाईन अर्ज दाखल करता येणार आहे.
Online-Admission
Online-Admissionsakal
Updated on
Summary

केंद्रीय विद्यालयांतील इयत्ता पहिलीच्या प्रवेश प्रक्रियेची घोषणा करण्यात आली असून, २७ मार्चपासून पालकांना ऑनलाईन अर्ज दाखल करता येणार आहे.

पुणे - केंद्रीय विद्यालयांतील इयत्ता पहिलीच्या प्रवेश प्रक्रियेची घोषणा करण्यात आली असून, २७ मार्चपासून पालकांना ऑनलाईन अर्ज दाखल करता येणार आहे. एप्रिलच्या शेवटच्या आठवड्यात प्रवेशासाठीची यादी जाहीर करण्यात येणार आहे. केंद्रीय विद्यालय संघटनच्या वतीने यासंबंधी ऑनलाईन परिपत्रक घोषीत करण्यात आले आहे.

केंद्र सरकारमध्ये नोकरीस असलेल्या कर्मचाऱ्यांची सातत्याने बदली होत असते. अशा कर्मचाऱ्यांच्या पाल्यांना एकसमान शिक्षण मिळावे, म्हणून केंद्रीय विद्यालयांची स्थापना करण्यात आली होती. आता त्यामध्ये सर्वच घटकांतील विद्यार्थ्यांना नियमानूसार प्रवेश दिला जातो.

इयत्ता पहिलीबरोबरच दूसरी ते दहावीच्या प्रवेशासाठीची सूचनाही प्रसिद्ध करण्यात आली आहे. तसेच इयत्ता ११वीच्या प्रवेशासाठी दहावीचे निकाल घोषित झाल्यानंतर १० दिवसांनी प्रवेश प्रक्रिया राबविण्यात येणार असल्याचेही केव्हीएसने स्पष्ट केले आहे. पहिलीच्या वर्गात प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी सहा वर्षाच्या वयाची अट निश्चित करण्यात आली आहे. इयत्ता दूसरीनंतरच्या प्रवेशासाठी ऑफलाईन पद्धतीने संबंधीत रिक्त जागांना प्रवेश दिला जाणार आहे.

Online-Admission
विशेष : बोर्ड परीक्षांनंतरचा वेळ प्रभावीपणे कसा वापरायचा

महत्त्वाच्या तारखा -

- इयत्ता पहिलीसाठी ऑनलाईन अर्ज - २७ मार्च ते १७ एप्रिल

- पहिली निवड यादी - २० एप्रिल

- दूसरी निवड यादी - २८ एप्रिल

- आरटीई अंतर्गत प्रवेश - ४ मे ते ११ मे

- इयत्ता दूसरी ते १० वी पर्यंतचे प्रवेश (ऑफलाईन) - ३ ते १२ एप्रिल

- इयत्ता ११ वी वगळता सर्व इयत्तांच्या प्रवेशाची अंतिम दिनांक - ३० जून

- इयत्ता ११वीचे प्रवेश - दहावीच्या निकालानंतर १० दिवसांच्या आत

संकेतस्थळ - https://kvsonlineadmission.kvs.gov.in/

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.