Pune News : तुम्ही जर पदव्युत्तर पदवीच्या शेवटच्या वर्षाला किंवा उत्तीर्णही झाले असाल तर राज्य पात्रता परीक्षा (सेट) २०२४ साठी आजच अर्ज करू शकता. सहाय्यक प्राध्यापक पदाबरोबरच संशोधनासाठीची पात्रता परीक्षा म्हणून ‘सेट’कडे पाहिले जाते. आपल्या भविष्यातील करिअर संधींसाठी सेट मूल्यवृद्धीच काम करू शकते.
महाराष्ट्र आणि गोवा राज्यासाठी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या सेट विभागातर्फे अर्ज प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. त्यानुसार शुक्रवार (ता.१२) पासून ऑनलाइन पद्धतीने अर्ज भरण्याच्या प्रक्रियेला सुरवात होणार आहे. ३९ व्या महाराष्ट्र सेट परीक्षेची सविस्तर जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. ७ एप्रिल २०२४ ला महाराष्ट्रासह गोव्यातही ही परीक्षा घेतली जाणार आहे. पेन आणि पेपर प्रकारातील म्हणजेच ऑफलाइन पद्धतीने परीक्षा घेतली ही शेवटची परीक्षा असल्याच सेट विभागाच्या वतीने स्पष्ट करण्यात आले आहे. यानंतरच्या सेट परीक्षा या ऑनलाइन पद्धतीने घेतल्या जाणार आहेत.
----------
सेट बद्दल थोडक्यात ः
- पात्र विद्यार्थी ः पदव्युत्तर पदवीच्या शेवटच्या वर्षाचे किंवा ती उत्तीर्ण झालेले सर्व
- परीक्षेचे स्वरूप ः परीक्षेत वस्तुनिष्ठ बहुपर्यायी स्वरूपाचे प्रश्न
- पेपर ः पेपर क्रमांक एक हा गणित, सामान्यज्ञानासह इतर विषयांवरील प्रश्नांवर आधारित असेल. तर पेपर क्रमांक दोन विद्यार्थ्यांनी निवडलेल्या विशेष विषयाचा असणार आहे.
- शुल्क ः परीक्षेच्या नोंदणीसाठी खुल्या प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी आठशे रुपये तर राखीव प्रवर्गातील विद्यार्थ्यांना साडेसहाशे रुपये इतके शुल्क आहे.
------------------
महत्त्वाच्या तारखा ः
- नियमित शुल्कासह अर्ज भरण्याची मुदत ः १२ ते ३१ जानेवारी
- विलंब शुल्कासह अर्ज भरण्याची मुदत ः १ ते ७ फेब्रुवारी
- ऑनलाइन अर्जात दुरुस्तीची मुदत ः ८ ते १० फेब्रुवारी
- प्रवेशपत्र उपलब्धतेची संभाव्य दिनांक ः २८ मार्च
- परीक्षेचे आयोजन ः ७ एप्रिल
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.