मुंबई : दक्षिण मध्य रेल्वे (SCR), दक्षिण पूर्व रेल्वे (SER) आणि उत्तर पश्चिम रेल्वे (NWR) च्या रेल्वे भरती सेलने शिकाऊ पदांसाठी थेट भरती सुरू केली आहे. ७ हजार ९१४ पदांसाठी ही भरती होणार आहे.
शैक्षणिक पात्रता
मॅट्रिक्युलेशन (मॅट्रिक्युलेट किंवा 10+2 परीक्षा प्रणालीमध्ये १० वी) एकूण किमान ५०% गुणांसह (अतिरिक्त विषय वगळून) आणि NCVT/SCVT (ज्या ट्रेडमध्ये शिकाऊ उमेदवारी करायची आहे) द्वारे प्रदान केलेले ITI उत्तीर्ण प्रमाणपत्र. हेही वाचा - योग्य वेळेतच करा इच्छापत्र आणि व्हा चिंतामुक्त
रिक्त जागांचा तपशील
एकूण - ७९१४ पदे
SCR Apprentice - ४१०३
SER Apprentice - २०२६
NWR Apprentice - १७८५
वयोमर्यादा
उमेदवाराचे कमाल वय २४ वर्षांच्या आत असावे.
निवड प्रक्रिया
गुणवत्ता यादीतील कामगिरीनुसार उमेदवारांची निवड केली जाईल.
पगार
वेतनश्रेणी नियमांनुसार असेल.
अर्ज कसा करायचा ?
इच्छुक उमेदवार ऑनलाइन अर्ज करू शकतात. अर्ज करण्यासाठी लिंक -
१. http://34.93.184.238/instructions.php
२. https://iroams.com/RRCSER/applicationAfterIndex
३. https://rrcjaipur.in/
अर्ज शुल्क
Gen/OBC/EWS: 100/- आणि SC/ST/PWD: 0/-
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.