Buldhana Medical College : बुलडाणा वैद्यकीय महाविद्यालयातील शंभर जागा प्रवेशाला मान्यता

राष्ट्रीय आयुर्विज्ञान आयोग नवी दिल्ली अंतर्गत मेडिकल असेसमेंट अँड रेटीग बोर्ड (MARD) यांनी राज्यातील आठ वैद्यकीय महाविद्यालयाला सन २०२४ -२५ या शैक्षणिक वर्षापासून एमबीबीएस प्रवेशाला मंजुरात प्रदान केली.
बुलडाणा वैद्यकीय महाविद्यालयातील शंभर जागा प्रवेशाला मान्यता
बुलडाणा वैद्यकीय महाविद्यालयातील शंभर जागा प्रवेशाला मान्यताsakal
Updated on

बुलडाणा : बुलडाण्यासह राज्यातील आठ वैद्यकीय महाविद्यालयाला केंद्र शासनाने प्रवेशित मान्यता प्रदान करून दिल्यानंतर राज्य शासनाने सुद्धा बुलडाणा वैद्यकीय महाविद्यालयातील प्रथम वर्षाकरिता १०० विद्यार्थ्यांच्या प्रवेशला परवानगी दिली आहे. या संदर्भातील शासन निर्णय ४ ऑक्टोबरला निर्गमित झाला आहे.

राष्ट्रीय आयुर्विज्ञान आयोग नवी दिल्ली अंतर्गत मेडिकल असेसमेंट अँड रेटीग बोर्ड (MARD) यांनी राज्यातील आठ वैद्यकीय महाविद्यालयाला सन २०२४ -२५ या शैक्षणिक वर्षापासून एमबीबीएस प्रवेशाला मंजुरात प्रदान केली. यामध्ये बुलडाणा येथील वैद्यकीय महाविद्यालयाचाही समावेश होता त्यानुसार येथील वैद्यकीय महाविद्यालयास प्रथम वर्षाकरिता १०० विद्यार्थी प्रवेश परवानगी महाराष्ट्र शासनाच्या वैद्यकीय शिक्षण व आरोग्य द्रव्य विभागाच्या वतीने प्रदान केली आहे.

तसा निर्णय शासन ४ ऑक्टोंबरला निर्गमित केला आहे

राज्यातील जनतेच्या हितासाठी कटिबद्ध असलेल्या वेगवान सरकारने तीनच दिवसात एमबीबीएस विद्यार्थ्यांच्या प्रवेशाला मान्यता देणारा शासन निर्णय निर्गमित केला. त्यामुळे आता राज्यात पूर्वीच्या एमबीबीएस प्रवेश क्षमतेत ८०० वाढ होऊन विद्यार्थ्यांना वैद्यकीय शिक्षणासाठी प्रवेश मिळणार आहेत. त्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी आरोग्य व कुटुंब कल्याणमंत्री जे. पी. नड्डा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि राज्याचे आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांच्या प्रति केंद्रीय आयुष व कुटुंब कल्याण राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी कृतज्ञता व्यक्त केली आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.