आज बरेच पर्याय उपलब्ध असल्याने आपल्या मुलाने कोणत्या क्लासमध्ये प्रवेश घ्यावा हे ठरवणे कठीण आहे. सुदैवाने, प्रत्येक गोष्टीसाठी आपल्याला खर्च करावा लागत नाही. संगणक विज्ञान आणि कोडिंग गेल्या अनेक दशकांपासून अस्तित्वात असल्याने त्यासाठीची अनेक संसाधने विनामूल्य उपलब्ध आहेत, त्यांची माहिती...
Scratch
Scratch ही ८ ते १६ वर्षांच्या मुलांसाठी विनामूल्य, व्हिज्युअल, ब्लॉक-आधारित प्रोग्रामिंग भाषा आहे. मॅसाच्युसेट इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नोलॉजी मीडिया लॅबद्वारे ही विकसित केली गेली आहे. मुले Scratchच्या ब्लॉक इंटरफेसचा वापर करून कथा, गेम आणि अॅनिमेशन तयार करू शकतात. हे प्रकल्प सामायिकदेखील केले जाऊ शकतात. जगभरात Scratch ही सर्वात लोकप्रिय प्रोग्रामिंग भाषा आहे, ज्यात मुलांना कोडिंगची ओळख करून दिली जाते. ती अत्यंत आकर्षक आणि समजण्यास सुलभ भाषा आहे. हार्वर्डमधील संगणक विज्ञानाच्या विद्यार्थ्यांकडून मुख्य संकल्पना सादर करण्यासाठी Scratchचा वापर केला जातो!
Scratch Jr.
आपण ScratchJrला Scratchचा धाकटा भाऊ मानू शकतो. ScratchJr ही एक व्हिज्युअल प्रोग्रामिंग भाषा आहे. ५-८ वयोगटातील मुलांना प्रोग्रामिंग कौशल्याची ओळख करुन देण्यासाठी याची निर्मिती केली गेली आहे. ScratchJrमध्ये प्रकल्प तयार करून, लहान मुले सर्जनशीलपणे विचार करण्यास आणि पद्धतशीरपणे तर्क करण्यास शिकू शकतात; वाचायला न येणारी मुलेदेखील याचा वापर करू शकतात. ScratchJr iOS, Android आणि Chromebook डिव्हाइसवर अॅप म्हणून विनामूल्य उपलब्ध आहे.
Code.org
Code.org ही अमेरिकेतील शालेय विद्यार्थ्यांना संगणक विज्ञान शिकवण्यासाठी विकसित केली गेलेली संस्था होती. यात सर्व वयोगटांसाठी विनामूल्य कोडिंग धड्यांची विस्तृत श्रृंखला आहे. आपला कोडिंग प्रवास सुरू करण्यासाठी संस्थेचे तपशीलवार अभ्यासक्रम आणि सराव प्रश्न उत्कृष्ट आहेत. संस्थेने शालेय शिक्षक अभ्यासक्रमाद्वारे संगणक विज्ञान शिकवू शकतील अशाप्रकारे अभ्यासक्रम विकसित केले आहेत.
Khan Academy
सर्व विषयांचे व्हिडिओंच्या स्वरूपात लहान धडे तयार करण्यासाठी खान अॅकॅडमी ही संस्था ओळखली जाते. खान अॅकॅडमीने अलीकडे त्यांच्या वेबसाइटवर संगणक विज्ञान आणि संगणनाचे धडे जोडले. येथे ९-१६ वर्ष वयोगटातील मुले संगणक विज्ञान आणि या व्हिडिओ धड्यांमधून कोडिंगच्या मूलभूत संकल्पनेची ओळख करून घेतात. व्हीडिओ Javascript, HTML/CSS, SQL सारख्या text-आधारित प्रोग्रामिंग भाषांवर मुख्यतः लक्ष केंद्रित करतात आणि दर्शकांना या भाषांचा चांगला परिचय करून देतात.
ही संसाधने उत्तम प्रतीची आहेत. तथापि, लहान मुलांना ही संसाधने नॅव्हिगेट करण्यासाठी आणि त्यांच्या शंकांचे निरसन करण्यासाठी पालकांच्या मार्गदर्शनाची आवश्यकता असते. मुलांना कोडिंग प्रवासासाठी शुभेच्छा!
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.