संधी नोकरीच्या : रोजगारक्षम बनण्यासाठी

Job
Job
Updated on

प्रथम वर्ष 
इंग्रजी भाषेतील आपले मूल्यांकन -

  • सर्वप्रथम विद्यार्थ्यांनी स्वतःच्या इंग्रजी भाषेच्या (समजणे व बोलणे) मूल्यांकन करावे. 
  • ग्रुप डिस्कशन, मुलाखत व चाचणीद्वारे  १ ते १० मूल्यांकन करून घेणे (१ - सर्वांत कमी,  तर १० - सर्वांत चांगले).
  • १ ते ४ मूल्यांकन असणाऱ्या विद्यार्थ्यांनी इंग्रजीचा ४० ते ६० तासांचा बेसिक आणि त्यानंतर ॲडव्हान्स कोर्स करावा. (हे कोर्सेस वेबसाइटवर मोफत उपलब्ध असतात).
  • ५ ते ७ मूल्यांकन असणाऱ्या विद्यार्थ्यांनी इंग्रजीचा ४० ते ६० तासांचा ॲडव्हान्स कोर्स करावा.
  • ८ ते १० मूल्यांकन असणाऱ्या विद्यार्थ्यांचे इंग्रजी चांगले असल्याने त्यांनी एखादी परदेशी भाषा शिकावी.
  • शनिवार/रविवार वा सुटीच्या दिवसांत किंवा महाविद्यालय सुटल्यानंतर सायंकाळी २ ते ३ तास जवळच्या इंडस्ट्रीत जाऊन शिकावे.
  • प्रत्येक सत्रात चांगला प्रोजेक्ट बनवावा.
  • प्रत्येक सत्रात एकाही विषयात नापास न होता कमीत कमी ६० टक्के गुण मिळवावेत.
  • दोन सत्रातील सुट्यांमध्ये कमीत कमी १५ दिवस औद्योगिक प्रशिक्षण घ्यावे.

द्वितीय वर्ष 

  • कुठलीही एक परदेशी भाषा (जपानी, जर्मन, फ्रेंच) शिकल्यास नोकरीची संधी मोठ्या प्रमाणावर मिळतात. ४ ते ५ लेव्हलपैकी कमीत कमी २ ते ३ लेव्हल विद्यार्थ्याने पदवीपर्यंत पूर्ण कराव्यात, त्यासाठी दुसऱ्या वर्षापासूनच सुरुवात करावी. 
  • प्रेझेंटेशन स्किल्स व स्टेज डेअरिंग वाढवण्यासाठी एक प्रेझेंटेशन बनवून सादरीकरण करावे.
  • IIT TECHFEST सारख्या चांगल्या प्रतीच्या टेक्निकल स्पर्धांमध्ये जरूर भाग घ्यावा.
  • ॲप्टिट्यूड बेसिक प्रशिक्षण ४० तास घ्यावे. 
  • प्रोग्रॅमिंगचा बेसिक कोर्स करावा.
  • रोजच्या जीवनात इंग्रजी भाषेचा वापर करावा.

तृतीय वर्ष 

  • भविष्यातील उपयुक्त तंत्रज्ञानातील आपल्या क्षेत्राशी निगडित व आपल्या आवडीचा ४०-६० तासांचा कोर्स करावा. 
  • उच्च शिक्षणासाठी जायचे असल्यास त्याची तयारी करावी. GRE/GMAT/CET/CAT/GATE/MPSC/UPSC सारख्या परीक्षांची तयारी एक ते दीड वर्ष केल्यास चांगला स्कोअर मिळवता येतो.
  • ॲप्टिट्यूड, प्रोग्रॅमिंगचा ॲडव्हान्स कोर्स करावा.
  • ॲप्टिट्यूड व G.D ची सराव परीक्षा द्यावी. 
  • कमीत कमी २-३ वेळा सराव मुलाखती द्याव्यात (Technical व HR)  
  • कमीत कमी १५-२० Mock Aptitude Test (सराव परीक्षा) द्याव्यात. सर्व पेपर घड्याळ लावून सोडवावीत. ७. चांगल्या संशोधन पुस्तिकेत एखादा पेपर प्रकाशित करावा. (उदा ः Scopus, IEEE, Web Of Science, SCI etc.)
  • स्वतःचा उद्योग सुरू करायचा असल्यास लघुउद्योग वा मध्यम वर्गातील उद्योगांची प्रत्यक्षात जाऊन माहिती घ्यावी.
  • इंटर्नशिपसाठी दोन महिने (Affiliated Colleges) ते सहा महिने (Autonomous Colleges) कंपनीत काम करावे.
  • TCS,INFOSYS, CAPGEMINI,ACCENTURE सारख्या mass recruitment करणाऱ्या कंपन्यांच्या प्रत्येक कंपनीसाठीच्या त्यांच्या पॅटर्नच्या कमीत कमी ४-५ सराव परीक्षा सोडवाव्यात.  
  • Hacker Rank व Hacker Earth यासारख्या वेबसाइटवर प्रोग्रॅमिंगचा सराव करावा.
  • TCS Next step Website व Infosys च्या InfyTQ या ॲपवर मोफत प्रशिक्षणाची सोय असते. १३. KPIT Sparkle, TCS Codevita, Capgemini Tech Fiesta, Hack with Infy यासारख्या स्पर्धांमध्ये जरूर भाग घ्यावा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.