Ashneer Grover : तरूणांचं मर्सिडिजचं स्वप्न अशनीरच्या कंपनीत पूर्ण होणार!

नव्या स्टार्टअपमध्ये नोकर भरती करण्याबरोबरच ग्रोव्हर यांनी एक ऑफर दिली आहे.
Ashneer Grover
Ashneer GroverSakal
Updated on

Ashneer Grover : शार्क टँक सिझन 1 चे जज आणि भारत पे चे संस्थापक यांच्या नव्या स्टार्टअपमध्ये भरती सुरू करण्यात आली आहे.

हे ही वाचा : या महामार्गामुळं खरंच येईल 'समृद्धी'?

Ashneer Grover
Weight Loss Tips: वजन कमी करायचंय? अशनीर ग्रोवरनेही 'या' दोन गोष्टी फॉलो करत कमी केले 10 किलो वजन

मंगळवार १० जानेवारीपासून ही भरती प्रक्रिया सुरू करण्यात आली असून, नव्या स्टार्टअपमध्ये पैसे गुंतवण्यासाठी मोठ्या प्रमाणात गुंतवणुकदारांनी पुढे यावे, असे आवाहन ग्रोव्हर यांनी केले आहे

नव्या स्टार्टअपमध्ये नोकर भरती करण्याबरोबरच ग्रोव्हर यांनी एक ऑफर दिली आहे. सध्या या ऑफरची जोरदार चर्चा सुरू आहे.

Ashneer Grover
Startup : व्यवसायवृद्धीला बूस्टर देणारे ‘ॲडबनाओ’ स्टार्टअप

2022 मध्ये अशनीर ग्रोव्हर यांनी त्यांची स्टार्टअप कंपनी 'थर्ड युनिकॉर्न' ची घोषणा केली होती. मात्र त्यानंतर या कंपनीकडून कोणतीही ठोस घोषणा करण्यात आली नव्हती.

या भरतीबाबत ग्रोव्हर यांनी इन्टाग्रामवर त्यांच्या स्टार्टअपबाबत माहिती शेअर करताना ग्रोव्हर यांनी लिहिले आहे की, 'चला 2023 मध्ये काही काम करूया. 'थर्ड युनिकॉर्न'च्या माध्यमातून आम्ही बाजारपेठ हलवून ठेवण्याचे काम करत असल्याचे ग्रोव्हर यांनी म्हटले आहे.

Ashneer Grover
Sanjay Raut : संजय राऊत हुशार आहेत पण...; भाजप नेत्याकडून राऊतांना जोरदार चिमटा

या स्टार्टअपला केवळ आमच्या स्वतःच्या कमाईने किंवा भांडवली पैशातून निधी देणार असल्याचेही ग्रोव्हर यांनी स्पष्ट केले आहे. नव्याने सुरू करण्यात येणाऱ्या या स्टार्टअपमध्ये फक्त 50 लोकांची टीम असेल.

ज्या व्यक्ती त्यांच्या 'थर्ड युनिकॉर्न' मध्ये सलग 5 वर्षे काम करतील त्यांना कंपनीकडून मर्सिडीज दिली जाईल असे ग्रोव्हर यांनी म्हटले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.