बॅंक ऑफ बडोदाने वेल्थ मॅनेजमेंट सर्व्हिसेस विभागात सिनिअर रिलेशनशिप मॅनेजर आणि ई-वेल्थ रिलेशनशिप मॅनेजर पदांच्या भरतीसाठी जाहिरात प्रसिद्ध केली आहे.
सोलापूर : बॅंकेत सरकारी नोकरीसाठी (Government Job) इच्छुक असलेल्या इच्छुकांसाठी ही खूषखबर आहे. बॅंक ऑफ बडोदाने (Bank of Baroda) वेल्थ मॅनेजमेंट सर्व्हिसेस (Wealth Management Service) विभागात सिनिअर रिलेशनशिप मॅनेजर (Senior Relationship Manager) आणि ई-वेल्थ रिलेशनशिप मॅनेजर (E-Wealth Senior Relationship Manager) पदांच्या भरतीसाठी जाहिरात प्रसिद्ध केली आहे.
बॅंकेने प्रसिद्ध केलेल्या भरती जाहिरातीनुसार, दोन्ही पदांसाठी एकूण 376 पदांची भरती करायची आहे, ज्यामध्ये 326 रिक्त पदे ही सिनिअर रिलेशनशिप मॅनेजर आणि 50 रिक्त जागा ई-वेल्थ रिलेशनशिप मॅनेजर पदांसाठी आहेत. उमेदवारांनी नोंद घ्यावी की, ही सर्व पदे कंत्राटी पद्धतीने भरती करण्यात येणार असून, कराराचा कालावधी पाच वर्षांचा असेल. तथापि, कराराच्या दरम्यान नियतकालिक कामगिरीचे पुनरावलोकन केले जाईल.
असा करा अर्ज...
इच्छुक उमेदवार बॅंक ऑफ बडोदाच्या अधिकृत वेबसाइट bankofbaroda.in वरील करिअर विभागात प्रदान केलेल्या ऑनलाइन फॉर्मद्वारे अर्ज करू शकतात. अर्ज प्रक्रिया 19 नोव्हेंबर 2021 पासून सुरू झाली असून उमेदवार 9 डिसेंबर 2021 पर्यंत ऑनलाइन अर्ज भरू शकतात. ऑनलाइन अर्जादरम्यान उमेदवारांना 600 रुपये शुल्क देखील भरावे लागेल, जे ऑनलाइन माध्यमातून भरता येईल. तथापि SC, ST आणि दिव्यांग उमेदवारांसाठी अर्ज शुल्क फक्त 100 रुपये आहे.
बॅंक ऑफ बडोदा रिलेशनशिप मॅनेजर भरतीसाठी पात्रता निकष
बॅंक ऑफ बडोदाने जारी केलेल्या रिलेशनशिप मॅनेजर पद भरतीसाठीच्या जाहिरातीनुसार, सिनिअर रिलेशनशिप मॅनेजर पदांसाठी अर्ज करू इच्छिणारे उमेदवार मान्यताप्राप्त विद्यापीठातून किंवा इतर कोणत्याही उच्च शिक्षण संस्थेतून संबंधित कामाचा 2 वर्षांचा अनुभव असलेले पदवीधर असावेत. तसेच, उमेदवाराचे वय 1 नोव्हेंबर 2021 रोजी 24 वर्षांपेक्षा कमी आणि 35 वर्षांपेक्षा जास्त नसावे. त्याचप्रमाणे ई-वेल्थ रिलेशनशिप मॅनेजर पदांसाठी उमेदवारांना पदवी तसेच दीड वर्षाचा कामाचा अनुभव असावा आणि उमेदवाराचे वय 23 वर्षांपेक्षा कमी आणि 35 वर्षांपेक्षा जास्त नसावे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.