Banking Job : बँक ऑफ महाराष्ट्रमध्ये प्रशिक्षणार्थी पदांवर तरुणांची भरती

अर्ज करण्याची प्रक्रिया १३ डिसेंबरपासून सुरू झाली असून ती २३ डिसेंबरपर्यंत सुरू राहणार आहे.
Banking Job
Banking Jobgoogle
Updated on

मुंबई : बँक ऑफ महाराष्ट्रमध्ये प्रशिक्षणार्थी पदांच्या भरतीसाठी अर्ज मागवले आहेत. अप्रेंटिसची पदे भरण्यासाठी अधिनियम १९६१ अंतर्गत एकूण ३१४ पदे भरली जात आहेत. या भरती प्रक्रियेद्वारे देशभरात विविध पदांवर नियुक्त्या केल्या जातील.

आंध्र प्रदेश, चंदीगड, छत्तीसगड, दिल्ली, गोवा, गुजरात, कर्नाटक, मध्य प्रदेश (एमपी), महाराष्ट्र, पंजाब, राजस्थान, उत्तर प्रदेश या राज्यांमध्ये नियुक्त्या केल्या जातील. अर्ज करण्याची प्रक्रिया १३ डिसेंबरपासून सुरू झाली असून ती २३ डिसेंबरपर्यंत सुरू राहणार आहे. हेही वाचा - असं एक गाव, जिथं जमिनीला कान लावला तरी संगीत ऐकू येतं...

Banking Job
Banking Job : स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये परीक्षेविना नोकरीची संधी

महत्त्वाच्या तारखा

ऑनलाइन अर्जाची सुरुवात तारीख – १३ डिसेंबर २०२२

ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख – २३ डिसेंबर २०२२

वयोमर्यादा

या पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे वय २० ते २८ वर्षे दरम्यान असावे. राखीव प्रवर्गातील उमेदवारांसाठी शासनाच्या नियमानुसार वयात सूट दिली जाईल.

Banking Job
Banking jobs : बँक ऑफ बडोदामध्ये पदवीधरांसाठी नोकरीची संधी

असा करा अर्ज

शिकाऊ पदांवर भरती करण्यासाठी, सर्व उमेदवारांना सर्वप्रथम बँक ऑफ महाराष्ट्रच्या bankofmaharashtra.in या वेबसाइटला भेट द्यावी. त्यानंतर ‘करिअर्स’ वर क्लिक करून ‘करंट ओपनिंग्ज’ वर क्लिक करा.

त्यानंतर Apply Online under Apprentices Act 1961 Project 2022-23 वर क्लिक करा. नंतर ‘Apply Online’ या पर्यायावर क्लिक करा. अर्जाची नोंदणी करण्यासाठी समोर दिसणाऱ्या लिंकवर क्लिक करा.

आता टॅब निवडून त्यात तुमचा तपशील प्रविष्ट करा. तपशील भरून झाल्यानंतर तो सत्यापित करा. त्यानंतर अर्ज जतन करा. नोंदणी पूर्ण करून पुढील वापरासाठी अर्जाची प्रिंट काढा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.