मोठी बातमी! देशात आता MBBS प्रमाणं 'बीडीएस'चाही अभ्यासक्रम साडेपाच वर्षांचा होणार; जाणून घ्या नवा बदल

बीडीएसचं सत्रही वार्षिक ऐवजी सहा महिन्यांच्या सेमिस्टरच्या स्वरूपात असणार आहे.
Bachelor of Dental Surgery
Bachelor of Dental Surgeryesakal
Updated on
Summary

केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं BDS अभ्यासक्रम बदलण्याच्या DCI च्या प्रस्तावाला सहमती दर्शवली आहे.

आता बॅचलर ऑफ डेंटल सर्जरी (Bachelor of Dental Surgery BDS) पदवीचा अभ्यासक्रमही एमबीबीएसप्रमाणं (MBBS) साडेपाच वर्षांचा असणार आहे. त्याचा प्रस्ताव तयार झाला असून, याची तयारीही सुरू झालीये.

यासोबतच बीडीएसचं सत्रही वार्षिक ऐवजी सहा महिन्यांच्या सेमिस्टरच्या स्वरूपात असणार आहे. त्याची शिफारस डेंटल कौन्सिल ऑफ इंडियानं (Dental Council of India DCI) केंद्र सरकारकडं पाठवली होती. त्यानंतर केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं (Union Ministry of Health) BDS अभ्यासक्रम बदलण्याच्या DCI च्या प्रस्तावाला सहमती दर्शवलीये. सूत्रांवर विश्वास ठेवला तर, लवकरच यासंदर्भात अधिसूचना जारी केली जाऊ शकते.

Bachelor of Dental Surgery
Karnataka High Court : भाजप सरकारला मोठा दणका; उच्च न्यायालयानं वोक्कालिगा-लिंगायत आरक्षणाला दिली स्थगिती!

सेमिस्टर पद्धत लागू होणार

आता बीडीएस अभ्यासक्रम एक वर्षाच्या इंटर्नशिपसह पाच वर्षांचा असल्याचं तज्ज्ञांचं म्हणणं आहे. नवीन सत्रापासून हा अभ्यासक्रम एक वर्षाच्या इंटर्नशिपसह साडेपाच वर्षांचा असेल. या बदलांतर्गत एमबीबीएसप्रमाणं सेमिस्टर पद्धत लागू करण्यात येणार आहे. संपूर्ण कोर्समध्ये एकूण नऊ सेमिस्टर असतील आणि एक वर्षाची इंटर्नशिप करावी लागेल. याअंतर्गत बीडीएसच्या विद्यार्थ्यांनाही एमबीबीएसप्रमाणं दर सहा महिन्यांनी परीक्षा द्यावी लागणार आहे. तर, आता विद्यार्थी वर्षातून एकदाच परीक्षा देतात.

Bachelor of Dental Surgery
VIDEO : आफ्रिकेच्या 'या' क्रिकेटरनं हिंदूंना बनवलं मुस्लिम; पाकिस्तानी क्रिकेटपटूचा खळबळजनक दावा

पुढील सत्रात नवा नियम लागू होईल

अभ्यासक्रमातील हा नवा बदल पुढील सत्रापासून या अभ्यासक्रमांतर्गत प्रथम वर्षात प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांनाच लागू होईल. सेमिस्टर प्रणाली सुरू केल्यामुळं शिकणं सोपं होणार आहे. कारण, विद्यार्थ्यांना वर्षभर आठही विषयांवर काम करण्याऐवजी सहा महिन्यांच्या कालावधीसाठी केवळ 3-4 विषयांवर काम करावं लागणार आहे. नवीन प्रणालीसह बहुतेक विस्तृत विषय वेगवेगळ्या मॉड्यूलमध्ये विभागले जाऊ शकतात, जे दोन किंवा अधिक सेमिस्टरमध्ये विभागले जाऊ शकतात. नवीन अभ्यासक्रम आंतरराष्ट्रीय मानकांनुसार तयार करण्यात आला आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()