शहरामध्ये बहुधा असे एकही घर सापडणार नाही की, ज्यात इलेक्ट्रिक व इलेक्ट्रॉनिक वस्तू सापडणार नाहीत. अणुविद्युत कण (इलेक्ट्रॉन) आणि विद्युत ऊर्जेचा शोध जगात मोठी क्रांती घडवून गेला. विद्युत ऊर्जेवर चालणाऱ्या बल्ब, मोटर, इस्त्री, ओव्हन, मिक्सर, फ्रीज या व अशा अनेक इलेक्ट्रिक उपकरणांमुळे जीवन सुकर झाले, तर टीव्ही, संगणक, मोबाईल, यंत्रमानव या इलेक्ट्रॉनिक उपकरणांमुळे जीवन समृद्ध झाले.