Career Options in Finance : बँकेत काम करायचंय?

दोस्तांनो, बँकेमधलं करिअर हे छान पैसे, मान; तसंच माहिती, ज्ञान देणारं असं करिअर होऊ शकतं बरंका.
best career option in finance bank job education any degree graduate
best career option in finance bank job education any degree graduatesakal
Updated on
Summary

दोस्तांनो, बँकेमधलं करिअर हे छान पैसे, मान; तसंच माहिती, ज्ञान देणारं असं करिअर होऊ शकतं बरंका.

परवा बऱ्याच दिवसानंतर जोशीकाका भेटले. आपल्या मुदत ठेवींसाठी, कधी पेन्शनसाठी आधी आणखी कशासाठी ते नेहमी त्यांच्या बँकेत येत असत आणि आम्ही भेटत असू. आता भेटल्यावर मला म्हणाले, ‘‘अहो, आता बँक माझ्या घराखालीच आहे, म्हणून कमी येणं होतं.’’

best career option in finance bank job education any degree graduate
HDFC Bank: जर्मनीच्या लोकसंख्येहून अधिक HDFC चे ग्राहक; जगातील चौथ्या मोठ्या बँकेविषयीच्या 5 गोष्टी

जोशीकाका राहतात त्या भागात खासगी, सरकारी अशा मिळून तब्बल तीस बँका आहेत. ज्या पद्धतीने बँकेचा शाखाविस्तार होतो तेवढ्या पटीनं रोजगाराच्या संधीदेखील वाढत असतात. दोस्तांनो, बँकेमधलं करिअर हे छान पैसे, मान; तसंच माहिती, ज्ञान देणारं असं करिअर होऊ शकतं बरंका.

पण घराजवळ बँक असली म्हणजे नोकरी तिथंच आणि तशीच मिळते असं नाही. ती कुठेही मिळू शकते आणि त्यासाठी अनेक विशेष गुणदेखील लागतात. मग काय करावं लागतं बरं?बँकिंगमध्ये करिअर करायचं असेल, तर त्यासाठी तुम्हाला पदवी घ्यावी लागेल. कोणत्याही शाखेचा पदवीधर पात्र ठरू शकतो.

best career option in finance bank job education any degree graduate
Education policy : शिक्षण : धोरणाला दिशा मिळाली पण गती हवी

प्रत्येक बँकेचे पदवीचे गुण किती असावेत हे निराळं असू शकतं. बँकांमध्ये भरतीची विशेष परीक्षा असते. आयबीपीएसतर्फे (इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग पर्सोनेल सिलेक्शन) घेतली जाणारी ही स्पर्धा परीक्षा असते. स्कॉलरशिपमध्ये असते साधारण तशीच, किंवा त्याच्यापेक्षा जास्त कौशल्य आणि तर्ककौशल्य लागणारी ही परीक्षा असते. तिची तयारी तुम्ही वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षा देत करू शकता.

best career option in finance bank job education any degree graduate
Ajit Pawar Education : अनेकांची शाळा घेणारे अजित पवार फक्त 10वी पास ! या कारणाने सोडावे लागले होते शिक्षण..

ही कौशल्ये आवश्यक...

  • गणित, जमाखर्च, हिशेब व्यवस्थित जमणं किंवा शिकण्याची तयारी असणं आवश्यक आहे.

  • ग्राहकांशी सुसंवाद साधण्याची कला.

  • ताणतणावात काम करता येण्याचं कौशल्य.

  • बुद्धिमत्तेबरोबरच, अचूक निरीक्षणक्षमता, काम्पुटरचं ज्ञान.

  • बँकिंगचा एखादा डिप्लोमा किंवा सर्टिफिकेट कोर्स केला असेल तर चालेल; पण कोर्सपेक्षासुद्धा प्रत्यक्षात शिकण्याची इच्छा, तयारी आणि जिद्द असायला हवी.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.