Skills For Good Career: सध्याची परिस्थिती बघता आपल्या डिग्रीला महत्व असलं तरी डिग्री घेतली म्हणजे जॉब मिळेलच असं नाही. नोकरी मध्ये फक्त तुमच्या डिग्रीचे मार्क नाही तर आणखीनही खूप गोष्टी बघितल्या जातात. त्यात जर तुम्ही मोठ्या कंपनीत जाण्याची स्वप्न बघत असाल तर मग तुमच्याकडे हे स्किल्स असलेच पाहिजेत.
प्रत्येक व्यक्तीमध्ये काही खास स्किल्स असतात. या स्किल्सच्या माध्यमातून ती व्यक्ती आपल्या करियरच्या टॉपवर पोहोचते. अशा परिस्थितीत जर आपण कॉलेजमध्ये शिकत असताना या स्किल्सवर काम करु लागलात तर आपल्या करिअर ग्रोथचा प्रवास सुखकर होऊ शकतो.
शिक्षण कमी असल्यामुळे कुठे नोकरी मिळणार नाही असे तुम्हाला वाटत असेल. पण पुढे दिलेल्या कौशल्यांपैकी एखादे कौशल्य तुमच्याकडे असेल तर तुम्हाला त्या क्षेत्रात चांगले करिअर करता येईल. या कौशल्यांवर काम केल्याने तुमच्या करिअरचा संपूर्ण ग्राफ बदलेल. करिअरच्या वाढीसाठी आणि चांगल्या पगारासाठी कोणती नोकरी कौशल्ये आवश्यक आहेत ते जाणून घ्या.
डिजिटल इकॉनॉमीमध्ये नव्या टॅलेंटची गरज भासते आहे. त्याचे कारण म्हणजे डिजिटायझेशन, ऑटोमेशन आणि इतर मोठ्या बदलांमुळे काम करण्याची पद्धत बदलली आहे. याच स्किल्सची आणि कंपनी पॉलिसीची वाढती डिमांड बघत बाजारात काही फर्म्स सुरु झाल्या आहेत जे तुम्हाला जॉब शोधण्यासाठी मदत करतात. चला तर मग जाणून घेऊया अशा करियर ऑपर्चुनिटी बद्दल...
मिशेल पेज इंडिया (Michael Page India Mumbai)
डिजिटल लिट्रेसी
सेल्स अँड इंफ्लूएंसिंग
डेटा आधारित निर्णय
इनोवेटिव थिंकिंग
यासोबतच तुमच्यात रिलेशन निर्माण करण्याची उत्कृष्ट क्षमता असणं महत्त्वाचं आहे. तुम्हाला तुमचे रिलेशन जपता आले पाहिजे. ही गुणवत्ता विविध संस्कृती आणि अधिक लोकांपर्यंत पोहोचण्यास मदत करेल.
एबीसी कन्सलटंट (ABC Consultant)
इन्फॉर्मेशन आणि सायबर सिक्युरीटी
क्लाऊड
डिजिटल ट्रान्सफॉर्मेशन
डिजिटल मार्केटिंग
आर्टिफिशियल इंटेलिजन्स, मशीन लर्निंग आणि रोबोटिक प्रोसेस ऑटोमेशन
कंपन्या नियमित आणि सतत होणारी कार्ये सहज रितीने व्हावे यासाठी नवनवीन शोध लावत प्रयोग करता आहेत.यामुळे इथे तुमच्या मदतीची गरज लागेल.
सीआईईएल एचआर सर्विसेस (CIEL HR Services)
पूर्ण स्टॅक विकसक
सायबर सुरक्षा
डेटा सायन्स
रोबोटिक प्रोसेस ऑटोमेशन (RPA)
क्लाउड तंत्रज्ञान
सध्या डेटा सायंटिस्ट आणि डेटा इंजिनिअर्सना खूप मागणी आहे. त्यांची मागणी पुढील काही वर्षांतही कायम राहणार आहे.
करियर मध्ये ग्रोथ साठी या टिप्स करतील खूप मदत
गेल्या काही वर्षात मोठे चढ-उतार झाले आहेत. कोरोना नंतर आता कुठे परत सगळी घडी बसते आहे. पण यातूनही अनेक धडे मिळाले आहेत. करिअरमध्ये पुढे जाण्यास मदत होऊ शकते. चला, त्यांच्याबद्दल येथे जाणून घेऊया.
1. हेल्दी स्पर्धा करा
आपण आपल्या क्षमतेपेक्षा फक्त 1% चांगले असू शकतो ना? इंटरनेटशी कनेक्टेड असलेल्या या जगात, हा एक टक्क्याचा फरक सुद्धा खूप आहे. या सततच्या बदलामुळे तुम्हाला करियर मध्ये ग्रोथ करायला मदत होईल.
2. उत्पन्नाच्या सर्व संधी तयार करा
अनेकदा लोकं एक काम घेतात आणि तेच करत बसतात. कशाला? बाजारात अनेक लोकं आहे ज्यांना फ्रीलान्सर हवे असतात. आपले 9 तासाचे काम झाले की अशा लोकांकडे काम करा. याने तुमचे उत्पन्न वाढेल. शिवाय शेयर मार्केट मध्ये किंवा इतर ठिकाणी गुंतवणूक करुन सुद्धा तुम्ही पैसा कमावू शकतात. पैसा कमावणं आणि गरजेपेक्षा जास्त कमावण ही काळचीच गरज आहे.
3. तुमचे प्राधान्य काय आहे?
कोणतीही नवीन नोकरी, प्रोजेक्ट, असाइनमेंट घेण्यापूर्वी त्याची प्रक्रिया नीट समजून घ्या. या कामांसाठी अतिरिक्त वेळ द्यावा लागणार आहे. तुम्ही तुमच्या वैयक्तिक आयुष्यातून हा वेळ द्यायला तयार आहात का? हा प्राधान्यक्रम तुम्हाला ठरवावा लागेल.
4. तुम्हाला काय हवे आहे ते माहित आहे?
तुम्हाला काय हवे आहे हे तुम्हाला माहीत असले पाहिजे. हे शक्य आहे की तुम्हाला मोठ्या फर्ममध्ये 9-5 किंवा 11-7 नोकरी करायला आवडेल. यात बरोबर किंवा चूक असे काहीही नाही. फक्त तुमच व्हिजन (vision) स्पष्ट ठेवा आणि येणाऱ्या काळाचा विचार करत निर्णय घ्या.
5. शिकण्याची सवय लावा
कोरोनाने आपल्याला हे शिकवले आहे की वाचन-लेखनापासून काम करण्यापर्यंत सर्व काही घरबसल्या करता येते. तुमचे ज्ञान वाढवा. काहीतरी नवीन शिकण्याची सवय तुम्हाला तुमच्या करिअरमध्ये खूप पुढे नेऊ शकते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.