तीन महिन्यांपूर्वी Better.com च्या बॉसने झूम कॉलवर 900 कर्मचाऱ्यांना नोकरीवरून काढून टाकले. या गोष्टीची बरीच चर्चा झाली. त्यानंतर विशाल गर्ग यांना माफी लागावी लागली होती. पण आता हा बॉस पुन्हा एकदा आपल्या कंपनीतील निम्म्याहून अधिक कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकणार आहे. विशाल गर्ग लवकरच कंपनीतील आणखी 3,000 कर्मचाऱ्यांना काढून टाकणार आहेत.
TechCrunch च्या अहवालानुसार, कंपनीची परिस्थिती दिवसेंदिवस बिकट होत चालली आहे . त्यामुळे कंपनी मार्चमध्ये 40 ते 50 टक्के कर्मचार्यांना काढून टाकण्याची तयारी करते आहे. गेल्या काही दिवसांत कंपनीचे व्हाईस प्रेसिडंट (वित्त) क्लेटन कॅरोल, महाव्यवस्थापक (खरेदी) पॉल टायगर, विक्री प्रमुख स्टीफन रोजेन आणि रिअल इस्टेट प्रमुख ख्रिश्चन वॉलेस यांनी राजीनामा दिला आहे. भारतात कंपनीचे 2000 पेक्षा जास्त कर्मचारी आहेत.
ब्लूमबर्गच्या अहवालानुसार, Better.com ने भारतापेक्षा अमेरिकेतील भरपूर कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकले आहे. भारतातील कर्मचाऱ्यांना अमेरिकेच्या तुलनेत खूपच कमी पैसे द्यावे लागतात, हे यामगचे कारण असू शकते. इनसाइडरच्या अहवालानुसार, कंपनीच्या गुंतवणूकदारांनी गर्गने $1.6 दशलक्ष किमतीच्या निधीचा गैरवापर करून पैसे आपल्याकडे वळवले असल्याचा आरोप केला आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.