Airport Jobs 2024 : विमानतळावर नोकरीसाठी अर्ज भरण्यास मिळाली मुदतवाढ! अर्ज कुठे करावा? पगार किती मिळेल? वाचा सविस्तर

Bhartiya Aviation Services Recruitment 2024 : एअरपोर्टमध्ये जॉब करण्याची इच्छा असणाऱ्यांसाठी एक चांगली संधी सध्या उपलब्ध झाली आहे.
Bhartiya Aviation Services Recruitment 2024
Bhartiya Aviation Services Recruitment 2024
Updated on

Bhartiya Aviation Services Recruitment 2024 : एअरपोर्टमध्ये जॉब करण्याची इच्छा असणाऱ्यांसाठी एक चांगली संधी सध्या उपलब्ध झाली आहे. भारतीय एव्हिएशन सर्व्हिसेस (बीएएस) ने भारतीय विमानतळांसाठी ३ हजारहून अधिक पदांवर ग्राहक सेवा एजंट आणि लोडर/हाऊसकीपिंग या पदांसाठी अर्ज मागवले आहेत. या भरतीसाठीची अखेरची मुदत आता आणखी वाढवण्यात आली आहे. त्यामुळे जे उमेदवार अद्याप अर्ज करू शकलेले नाहीत ते या भरतीत सहभागी होऊ शकतात.

अधिकृत वेबसाईट www.bhartiyaaviation.in वर ३१ ऑक्टोबरपर्यंत उमेदवारांना अर्ज भरता येणार आहेत.

व्हॅकन्सी किती आहेत?

भारतीय एव्हिएशन सर्व्हिसेसच्या या भरतीमध्ये महिला आणि पुरुष कस्टमर सर्व्हिस एजंट/ एअरपोर्ट हाऊसकीपिंग या पदांसाठी भरती केली जाणार आहे

ग्राहक सेवा एजंट (CSA) - २६५३ पदे

लोडर/हाउसकीपिंग - ८५५

एकूण - ३५०८

Bhartiya Aviation Services Recruitment 2024
Jammu Kashmir Assembly Election : '...तोपर्यंत सरकार स्थापन करू नये!', रशीद इंजिनिअर यांचे जम्मू-काश्‍मीरमधील पक्षांना आवाहन

या एअरपोर्ट भरतीसाठी अर्ज करण्यासाठी, उमेदवारांनी मान्यताप्राप्त बोर्डातून १०वी/१२वी उत्तीर्ण केलेली असावी. CSA साठी, उमेदवारांचे किमान वय १८ वर्षे आणि कमाल वय २८ वर्षे असावे. लोडर/हाउसकीपिंगसाठी कमाल वय ३३ वर्षे निश्चित करण्यात आले आहे. १ जुलै २०२४ रोजी वयाची गणना केली जाईल. मात्र, राखीव प्रवर्गांना कमाल वयोमर्यादेत सूट देण्यात आली आहे. अधिकच्या माहितीसाठी तुम्ही येथे क्लिक करून नोटिफिकेशन देखील वाचू/ डाऊनलोड करू शकता.

Bhartiya Aviation Services Recruitment 2024
Jammu Kashmir Election : ३७० हटवल्यानंतरच्या पहिल्याच निवडणुकीत भाजपचा पराभव! ओमर अब्दुल्ला होणार जम्मू-काश्मीरचे मुख्यमंत्री

पगार किती मिळेल?

सीएएसच्या पदावर निवडण झालेल्या उमेदवारांना १३,००० ते ३०,००० रुपये वेतन दिले जाईल. तर लोडर/हाऊसकीपिंगसाठी १२,००० ते २०,००० रुपये प्रति महिना पगार मिळेल.

सीएस पदासाठी अर्ज करताना उमेदवारांना ३८० रुपये अॅप्लिकेशन फी द्यावी लागेल, तर लोडर आणि हाऊसकीपिंग प्रोफाइलसाठी हे शुल्क ३४० रुपये परीक्षा शुल्क असेल.

निवड प्रक्रिया - या भरतीसाठी उमेदवारांची निवड ही लिखित परीक्षेच्या माध्यमातून केली जाईल.

लेखी परीक्षेत सर्व प्रश्न MCQ चे म्हणजेच वस्तुनिष्ठ प्रकाराचे विचारले जातील. परीक्षेचा कालावधी ९० मिनिटांचा असेल. परीक्षेत निगेटिव्ह मार्किंग नसेल. भरतीशी संबंधित इतर कोणत्याही माहितीसाठी, उमेदवार इंडियन एव्हिएशन सर्व्हिसेसच्या अधिकृत वेबसाइटला भेट देऊ शकतात.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.