मुंबई : बृहन्मुंबई महानगरपालिकेतील कार्यकारी सहायक (लिपिक) (Clerk) पदासाठी 1,846 जागांच्या भरती जाहिरात महिन्याभरापूर्वी निघाली होती. या जाहिरातीसाठी राज्यभरातून हजारो उमेदवारांनी अर्ज केले आहेत. पण एका जाचक अटीमुळं अनेकांना अर्ज भरता आला नव्हता. याविरोधात राज्यभरातून तीव्र संताप व्यक्त करण्यात आला होता.
याविरोधात अनेक राजकीय नेत्यांनी आवाजही उठवला होता. त्यामुळं आता महापालिकेनं यात महत्वाचा बदल करण्याचा निर्णय घेतला आहे. तसंच पुन्हा जाहिरातीत बदल करुन ती प्रसिद्ध केली आहे. त्यामुळं आता जे उमेदवार अर्ज करण्यापासून वंचित राहिले होते त्यांना याचा लाभ घेता येणार आहे.
नव्या जाहिरातीनुसार, येत्या पंधरा दिवसांत पुन्हा भरती प्रक्रिया सुरु होणार आहे. यामध्ये यापूर्वी या जाहिरातीसाठी अर्ज केलेल्या उमेदवारांना पुन्हा अर्ज करण्यााची गरज नाही. त्यांचे अर्ज पुढील भरती प्रक्रियेत ग्राह्य धरले जाणार आहेत, असं महापालिका प्रशासनानं स्पष्ट केलं आहे. लिपिक संवर्गातील रिक्त पदं सरळसेवेनं भरण्यासाठी 20 ऑगस्ट 2024 पासून ऑनलाईन अर्ज भरती प्रक्रिया सुरु करण्यात आली होती. पण आता नव्या जाहिरातीनुसार 21 सप्टेंबर २०२४ पासून अर्ज भरता येणार असून ११ ऑक्टोबर २०२४ पर्यंत शेवटची तारीख असणार आहे.
या भरतीसाठी उमेदवार दहावी आणि पदवी परीक्षा प्रथम प्रयत्नात उत्तीर्ण असावा अशी शैक्षणिक अर्हता लागू होती. आता आलेल्या विविध सुचनांनुसार ‘प्रथम प्रयत्नात’ ही अट रद्द करण्याचा निर्णय पालिकेनं घेतला आहे. त्यामुळं आता नव्यानं जाहिरात प्रसिद्ध करून येत्या पंधरा दिवसांच्या आत भरती प्रक्रिया पुन्हा सुरु करण्यात येणार आहे.
बृहन्मुंबई महानगरपालिका अंतर्गत 'कार्यकारी सहाय्यक (लिपिक)' पदांच्या एकूण 1,845 रिक्त जागा भरण्यासाठी पदांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 11 ऑक्टोबर 2024 आहे. हे अर्ज ऑनलाईन पद्धतीनं सादर करायचे आहेत.
पदाचे नाव – कार्यकारी सहाय्यक (लिपिक)
पदसंख्या – 1,845 जागा
शैक्षणिक पात्रता – पदाच्या आवश्यकतेनुसार (मूळ जाहिरात पाहावी)
वयोमर्यादा – 18 – 43 वर्षे
नोकरी ठिकाण – मुंबई
वेतन - Rs. 25,500/- to 81,100/-
खुल्या वर्गासाठी – रु. 1000 /-
आरक्षित वर्गासाठी – रु. 900/-
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 11 ऑक्टोबर 2024
अधिकृत वेबसाईट – https://www.mcgm.gov.in/
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.