अग्रलेखकार लोकमान्य टिळक

टिळकांच्या एका वेगळ्या पैलूवर प्रकाश टाकणाऱ्या पुस्तकाची ओळख करून घेऊया. हे पुस्तक आहे, डॉ. विश्वास मेहेंदळे लिखित ‘अग्रलेखकार लोकमान्य टिळक’.
book agralekhakar Lokmanya Tilak
book agralekhakar Lokmanya Tilaksakal
Updated on

मित्र-मैत्रिणींनो, काल म्हणजेच २३ जुलै रोजी आपण लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांची जयंती साजरी केली. तसेच, एक ऑगस्ट रोजी त्यांच्या स्मृतिदिनीदेखील आपण त्यांचे स्मरण करतोच. यानिमित्त टिळकांच्या एका वेगळ्या पैलूवर प्रकाश टाकणाऱ्या पुस्तकाची ओळख करून घेऊया. हे पुस्तक आहे, डॉ. विश्वास मेहेंदळे लिखित ‘अग्रलेखकार लोकमान्य टिळक’.

आज काल आपल्याला ‘मीडिया इन्फ्लुएन्झर’ ही संकल्पना काही नवीन नाही. अशाच पद्धतीने आपल्या पारतंत्र्याच्या काळात ‘मीडिया इन्फ्लुएन्झर’ ठरलेल्या एका स्वातंत्र्यसेनानीच्या अग्रलेखांची आणि त्या माध्यमातून त्यांनी केलेल्या अफाट राष्ट्रकार्याची ओळख करून देणारे हे पुस्तक आहे.

आजच्याइतके तंत्रज्ञान विकसित झाले नसताना आणि संपर्काची साधनेही तुटपुंजी साधने हाती असताना, लोकमान्य टिळकांनी वृत्तपत्र हे माध्यम हाती घेतले आणि त्यातून त्यांनी देशवासीयांमध्ये स्वातंत्र्यप्राप्तीची भावना चेतवण्याचे काम केले. त्या काळात टिळकांच्या अग्रलेखांची आतुरतेने वाट पाहिली जात असे.

तत्कालीन घडामोडींबद्दल टिळकांचे मत काय आहे, यावर बहुसंख्य लोक त्यांची मते ठरवत असत. त्यामुळेच टिळकांच्या अग्रलेखांना ब्रिटिशही अत्यंत घाबरून असत. तत्कालीन समाजावर या अग्रलेखांचा पडलेला प्रभाव या पुस्तकाच्या माध्यमातून आपल्याला वाचायला मिळतो. त्याचप्रमाणे या अग्रलेखांकडे आजच्या संदर्भात कसे पाहता येईल आणि ते अग्रलेख कसे समजावून घेता येतील याची मांडणीही लेखकाने केली आहे.

या पुस्तकात टिळकांनी लिहिलेल्या अग्रलेखांची विषयावर यादी देण्यात आली आहे. या यादीवरून आपल्या लक्षात येते की टिळकांनी किती वेगवेगळ्या विषयांवर लेखन केले आहे. ब्रिटिशांच्या जुलमी सत्तेवर आसूड ओढणारे टिळकांचे लेखन हे तत्कालीन समाजस्थिती, सांस्कृतिक जडणघडण, शेतीविषयक दृष्टिकोन आणि मार्गदर्शन, मराठी भाषा, समाज सुधारणा, यांसारख्या विविध विषयांनाही स्पर्श करणारे आहेत.

या अग्रलेखांची शीर्षके आजही वापरता येण्याइतकी ताजी आहेत, असे मत लेखकाने व्यक्त केले आहे, त्यावरून टिळकांच्या लेखनाचा आवाका आणि त्यांच्या विचारांची सर्वव्यापकता आपल्या लक्षात येते. अग्रलेखाच्या माध्यमातून लोकशिक्षकाचे काम करणाऱ्या लोकमान्यांच्या एका वेगळ्या पैलूची ओळख करून घेण्यासाठी हे पुस्तक आवर्जून वाचायला हवे.

(संकलन : रोहित वाळिंबे)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.