अभियंता आणि आर्किटेक्ट यांना बीएसएफमध्ये सेवेची संधी

अर्ज करण्याची शेवटची तारीख ८ जून २०२२ आहे.
BSF
BSFgoogle
Updated on

मुंबई : सरकारी नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. border security forceमध्ये ग्रुप बी मधील विविध पदांसाठी भरती सुरू करण्यात आली आहे. इच्छुक उमेदवारांना rectt.bsf.gov.in या संकेतस्थळावरून अर्ज करता येईल.

BSF
RBI मध्ये नोकरीची संधी! पदवीधारकांसाठी 303 जागांवर भरती सुरू

या भरतीमध्ये अभियंता संचातील ग्रुप बी मधील (नॉन गॅजेट- नॉन मिनिस्ट्रियल) ९० पदे भरली जातील. अर्ज करण्याची शेवटची तारीख ८ जून २०२२ आहे.

रिक्त पदांचा तपशील

१. कनिष्ठ अभियंता/उपनिरीक्षक (इलेक्ट्रिकल) - ३२ पदे
२. निरीक्षक (आर्किटेक्ट) - १ पद
३. उपनिरीक्षक (वर्क्स) - ५७ पद

BSF
भारतीय सैन्याकडून अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांना आवताण.... ४० जागांवर भरती सुरू

शैक्षणिक पात्रता

निरीक्षक पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांकडे कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठाची वास्तुस्थापत्यशास्त्राची पदवी असणे आवश्यक आहे. उपनिरीक्षक पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी तीन वर्षांचा पदविका अभ्यासक्रम पूर्ण केलेला असावा. कनिष्ठ अभियंता पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराने मान्यताप्राप्त विद्यापीठातून तीन वर्षांचा इलेक्ट्रीकल अभियांत्रिकीमधील पदविका अभ्यासक्रम पूर्ण केलेला असावा.

अर्ज शुल्क

२०० रुपये अर्ज शुल्क आहे. महिला आणि आरक्षित वर्गांतील उमेदवारांना कोणतेही अर्ज शुल्क नाही.

वयोमर्यादा

अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय ३० वर्षांपेक्षा अधिक नसावे. आरक्षित वर्गांतील उमेदवारांना सरकारी नियमानुसार सूट देण्यात आली आहे.

वेतन

इन्स्पेक्टर आर्किटेक्ट - ४४ हजार ९०० ते १ लाख ४२ हजार रुपये
कनिष्ठ अभियंता/उपनिरीक्षक (इलेक्ट्रिकल) आणि उपनिरीक्षक (वर्क्स) - ३५ हजार ४०० ते १ लाख १२ हजार ४०० रुपये.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.