डिप्लोमा धारकांसाठी नोकरीची संधी; BSNL मध्ये 'या' जागांसाठी होणार भरती

BSNL Recruitment 2022
BSNL Recruitment 2022esakal
Updated on
Summary

BSNL मध्ये काम करू इच्छिणाऱ्या उमेदवारांसाठी एक आनंदाची बातमी आहे.

BSNL Recruitment 2022 : BSNL मध्ये काम करू इच्छिणाऱ्या उमेदवारांसाठी एक आनंदाची बातमी आहे. भारत संचार निगम लिमिटेड (BSNL), भारत सरकारच्या (Government of India) सार्वजनिक क्षेत्रातील कंपनीनं पंजाब सर्कलमध्ये (Punjab Circle) तंत्रज्ञ अप्रेंटिसच्या (Technician Apprentices) 24 पदांसाठी जाहिरात प्रसिद्ध केलीय. कंपनीनं 17 फेब्रुवारी 2022 रोजी अमृतसर, चंदीगड, फिरोजपूर, होशियारपूर, जालंधर आणि पटियाला या ठिकाणी ही जाहिरात (क्रमांक PBCO-11/18(15)/1/2020-HR ADMIN) प्रसिध्द करण्यात आलीय. दरम्यान, या रिक्त पदांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत.

या पदांसाठी अर्ज करू इच्छिणारे उमेदवार भारत सरकारच्या mhrdnats.gov.in या पोर्टलला भेट देऊन अर्ज करू शकतात. अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी त्यांचे आधार कार्ड, शैक्षणिक प्रमाणपत्र, पासपोर्ट आकाराचा फोटो, बँक खात्याचा तपशील, ईमेल आयडी आणि मोबाइल क्रमांक भरुन आपला अर्ज सादर करावा. BSNL ने या पदांसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 9 मार्च 2022 निश्चित केलीय.

BSNL Recruitment 2022
परीक्षेशिवाय बना ऑफिसर, लाखोंमध्ये मिळेल पगार, आजच करा अर्ज

पात्रता आणि निवड

या पदांसाठी इच्छुक उमेदवाराने संबंधित व्यापारातील अभियांत्रिकी डिप्लोमा उत्तीर्ण केलेला असावा. तसेच, अर्जाच्या शेवटच्या तारखेनुसार म्हणजेच, ९ मार्च २०२२ रोजी उमेदवाराचं वय २५ वर्षांपेक्षा जास्त नसावं. डिप्लोमामध्ये मिळालेल्या गुणांच्या आधारे उमेदवारांची निवड केली जाईल. अर्जांच्या छाननीनंतर शॉर्टलिस्ट केलेल्या उमेदवारांना BSNL द्वारे संपर्क साधला जाईल. दरम्यान, BSNL च्या जाहिरातीनुसार उमेदवारांना नियुक्तीनंतर प्रति महिना 8,000 पगार दिला जाणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.