Business Idea: 50 हजारात सुरु करा हा बिझनेस, लाखो कमावण्याची ताकद

सध्या शेवग्याच्या शेंगांची शेती करण्याचा कल झपाट्याने वाढत आहे.
Business Idea, Drumstick farming
Business Idea, Drumstick farmingSakal
Updated on

Business Idea: नोकरी करणे दिवसेंदिवस अवघड होत चाललंय. टारगेट्स, कॉम्पिटीशन या सगळ्यामध्ये तरुण आता शेतीकडे वळतायत. तुम्ही असाच विचार करत असाल तर तुमच्यासाठी असाच एक बिझनेस प्लॅन आम्ही घेऊन आलो आहोत. आम्ही ज्या उत्पादनाबद्दल सांगत आहोत, ज्याची शहरासह खेड्यातही मोठी मागणी आहे. होय आम्ही नगदी पिकांबद्दल बोलत आहोत. याचे पिक चांगल्या पद्धतीने घेतल्यास लाखो रुपये सहज मिळू शकतात.

सध्या शेवग्याच्या शेंगांची शेती करण्याचा कल झपाट्याने वाढत आहे. याचे सर्वात मोठे कारण म्हणजे त्यात अनेक फायदेशीर गुणधर्म आहेत. याशिवाय त्याची लागवडही सहज करता येते. ही शेती सुरू करून, तुम्ही वार्षिक 6 लाख म्हणजेच मासिक 50,000 रुपये कमवू शकता.

Business Idea, Drumstick farming
100 रुपयांपेक्षा कमी किंमतीचा हा शेअर देईल तुम्हाला तगडा परतावा...

शेवग्याच्या शेंगांना इंग्रजीत ड्रमस्टिक म्हणतात. त्याचे वैज्ञानिक नाव मोरिंगा ओलिफेरा आहे. ड्रमस्टिकची लागवड केवळ भारतातच नाही तर जगातील अनेक देशांमध्ये केली जाते. फिलीपिन्सपासून श्रीलंकापर्यंत अनेक देशांमध्ये याची लागवड केली जाते. ओसाड जमिनीवरही त्याची लागवड करता येते.

ड्रमस्टिक ही एक औषधी वनस्पती आहे. कमी खर्चात तयार होणाऱ्या या पिकाचे वैशिष्ट्य म्हणजे एकदा पेरणी केल्यानंतर चार वर्षे पेरणी करावी लागत नाही. शेवग्याला वर्षातून दोनदा शेंगा लागतात. प्रत्येक रोपातून सुमारे 200-400 (40-50 किलो) शेवगा मिळतो. फायबर येण्याआधी शेवग्याची काढणी केल्याने बाजारात मागणी टिकून राहते आणि अधिक नफाही मिळतो.

Business Idea, Drumstick farming
50 रुपयांपेक्षा कमी किंमतीचा शेअर देईल मजबूत परतावा, तज्ज्ञांना विश्वास...

किती कमाई ?
एका एकरात सुमारे 1,200 रोपे लावता येतात. ड्रमस्टिक प्लांट लावण्यासाठी सुमारे 50,000-60,000 रुपये खर्च येतो. ड्रमस्टिकचे उत्पादन करून एक लाखाहून अधिक रुपये सहज कमावता येतात.

नुकसानीची शक्यता कमी-
कमी-जास्त पावसामुळे शेवग्याच्या झाडांना कोणतीही हानी होत नाही. शेवगा अनेक प्रकारच्या परिस्थितीत वाढणारी वनस्पती आहे. सर्व प्रकारच्या जमिनीत त्याची लागवड करता येते. पडीक, नापीक आणि कमी सुपीक जमिनीतही याची लागवड करता येते.

नोंद : क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.