दिवाळी आता काही दिवसांवरती आली आहे. दिवाळीत घर सजवणे, घराची स्वच्छता करणे, पूजा पाठ करणे रांगोळी दिवे लावणे या सगळ्या गोष्टी केल्या जातात. घर प्रसन्न व्हावं आणि इतरांपेक्षा आपले घर सुंदर दिसावे यासाठी प्रत्येक जण प्रयत्न करत असतो. दिवाळीत खऱ्या अर्थाने व्यापाऱ्यांची दिवाळी असते.
जर तुम्हीही काही व्यवसाय करण्याचा विचार करत असाल. तर हे सिझनेबल व्यवसाय करून तुम्ही जास्त नफा कमावू शकता. दिवाळीला अजून १२ दिवस बाकी आहेत. या दिवसात तुम्ही काही छोटे व्यवसाय करणार असाल तर या वस्तू विकण्याचा नक्कीच विचार करा. (Business Ideas For Diwali Festival)
आज आम्ही तुम्हाला अशा 5 व्यवसायांबद्दल सांगणार आहोत, ज्यामध्ये तुम्ही चांगली कमाई करू शकता. तसेच, तुम्ही सध्या काही व्यवसाय करत असाल तर त्यामध्ये या गोष्टी वाढवल्या तर तुमच्या व्यवसायाला गती मिळेल. आणि दिवाळीनंतरही काही दिवस तुम्हाला याचा लाभ होईल.
दिवाळीत विजेच्या दिव्यांना सर्वाधिक मागणी असते. दिवाळीपूर्वीच लोक त्यांची खरेदी सुरू करतात. सरकारी वास्तू असो की दुकान, सर्वच घरे अन् इमारती लाईट्सच्या प्रकाशाने चमकताना दिसतात. डेकोरेटिव्ह लाइट्सचा व्यवसाय तुम्ही छोट्या प्रमाणावर सुरू करू शकता. तसेच माल शिल्लक राहिला तरी लाईटच्या माळा खराब होत नाहीत. आणि पुढे ख्रिसमस, न्यु इअरसाठीही त्या तुम्ही विकू शकता.
सणासुदीच्या काळात सजावटीच्या वस्तूंची मागणीही मोठ्या प्रमाणात वाढते. लोक आपली घरे आणि दुकाने केवळ रंगीबेरंगी आकाश दिव्यांनीच चमकवत नाहीत, तर अनेक प्रकारच्या सजावटीच्या वस्तूंनी सजवतात. तुम्हाला हे दिवे होलसेल मार्केटला अगदी स्वस्तात मिळतील. तुम्ही चांगला दर लावून ते विकू शकता. यामध्ये तुम्ही चांगले पैसे कमवू शकता.
इलेक्ट्रॉनिक्स लाईट्सच्या कितीही व्हरायटी बाजारात आल्या तरी मातीच्या दिव्यांची मागणी कमी होत नाही. त्यामुळे, मातीचे दिवे नक्कीच विक्रीसाठी ठेवलेले असतात. कारण, दिवाळीला मातीच्या दिव्यांना मान असतो.
तुम्ही दिव्यांचा व्यवसाय सुरू करू शकता. यामध्येही तुम्हाला जास्त खर्चाची गरज नाही. आजकाल किरकोळ बाजारापासून ते ऑनलाइन प्लॅटफॉर्मपर्यंत सर्वत्र मातीच्या दिव्यांना मोठी मागणी आहे. अगदी कमी गुंतवणुकीत तुम्ही हा व्यवसाय सुरू करू शकता.
कोणताही सण असो पूजेच्या साहित्याला सर्वाधिक मागणी असते. सणासुदीच्या काळात पूजा साहित्याचा व्यवसाय शिगेला पोहोचतो. अशा परिस्थितीत तुम्ही या व्यवसायातही बंपर कमाई करू शकता. पूजा साहित्याला नेहमीच मागणी असते. तुम्ही अगरबत्ती, अगरबत्ती, दिवे इत्यादींचा व्यवसाय सुरू करू शकता. 4 ते 5 हजार रुपयांमध्ये तुम्ही हा व्यवसाय सुरू करू शकता.
दिवाळीला सर्व जुन्या वस्तू काढून नव्या वस्तू लावल्या जातात. तसेच, दिवाळीला खऱ्या फुलांची तोरणं अन् फुलांच्या माळांना मागणी असते. त्यामुळे तुम्हीही फुलांचा व्यवसाय करू शकता. फुलांच्या तोरणांनी घर सजवले जातात. त्यामुळे, घराला एक वेगळीच शोभा येते. त्यामुळे, तुम्ही या व्यवसायाचा नक्कीच विचार करू शकता.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.