आत्मविश्वास हवा; न्यूनगंड नको

confidance
confidance
Updated on

आत्मविश्वास म्हणजे नक्की काय? या साध्या प्रश्नाचे उत्तर आपल्याला समजल्यास आपण जीवनात मोठी प्रगती करू शकू. आत्मविश्वास म्हणजे स्वत-वर विश्वास असणे, की मी जीवनातील कुठल्याही अडीअडचणीला यशस्वीरीत्या सामोरे जाईन. थोडक्यात, आत्मविश्वास आपल्या मनाची स्थिती, जीवनाकडे बघण्याचा दृष्टिकोन असून, तो कसा वाढवायचा, हे आपल्याच हातात असते. आत्मविश्वास ही ‘स्व-जाणीव’ आहे. आपल्या प्रत्येकामध्ये ज्ञान, कौशल्य, क्षमता असते; पण त्याला आत्मविश्वासाची जोड देणे गरजेचे आहे. आपणच आपल्या गुणांवर अविश्वास दाखविल्यास इतर विश्‍वास कसे ठेवणार? तुम्हाला सर्व यशस्वी लोकांमध्ये एक समान बाब आढळून दिसून येईल आणि ती म्हणजे आत्मविश्वास.

देशभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

आत्मविश्वास वाढीसाठी हे करा
सकारात्मक राहा - दैनंदिन जीवनामध्ये आपण अनेकदा नकारात्मक विचार करतो. मी हे करू शकेन का, हे काम फार अवघड जाईल मला, मी परीक्षेत चांगले गुण मिळवेल का, मला व्यापारामध्ये नुकसान होणार नाही ना? असे विविध विचार आपल्या मनात येतात. असे विचार करणे टाळा. स्वत-मधील न्यूनगंड प्रत्येकाने कमी करावा. त्यासाठी नेहमी सकारात्मक राहा. सकारात्मक विचार प्रगती घडवून आणतो. भूतकाळात घडलेल्या सकारात्मक गोष्टींचे नेहमी स्मरण करा. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

तुलना करू नका - कधीही कोणाशी तुलना करू नये. समोरची व्यक्ती आपल्या जागी आणि आपण आपल्या जागी. त्या व्यक्तीचे गुण वेगळे असतील म्हणून त्याची प्रगती त्याच्या गुणांनुसार आणि आपली प्रगती आपल्या गुणांनुसार. तुलना करून काही फायदा नाही. तुलना करायचीच असल्यास स्वत-शी करा. 

स्वत-ला प्रोत्साहित करा - दररोज सकाळी आरशासमोर उभे राहून स्वत-मधले सर्व गुण निरखा. कोणी तुमची स्तुती केल्यास आभार माना; पण गर्व बाळगू नका. दिवसाखेरीज पूर्ण दिवसाचा विचार करा आणि काही विशेष काम केल्यास स्वत-च स्वत-च्या पाठीवर थाप देऊन शाबासकी द्या. एक वाक्य कायम लक्षात ठेवा
‘I can do it and I will do it.’

पिंपरी-चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

अडून राहा - जे ध्येय ठरविले आहे त्यावर अडून राहा. भलेही पहिल्या प्रयत्नात यश मिळणार नाही. पुन्हा जोमाने प्रयत्न करा आणि यशस्वी व्हा. अपयश ही यशाची पहिली पायरी असते. निरंतर प्रयत्न करत राहावे. न डगमगता स्वत-वर विश्वास ठेवा आणि ठरविलेले ध्येय गाठा.

मान्य करा - एखादी गोष्ट आपल्याला येत नसल्यास ती मान्य करायला शिका. उगाच मला येते म्हणून खोटी आश्वासने देऊ नका. दिलेल्या कार्याची सखोल माहिती घ्या आणि मग कोणाच्या तरीही साह्याने ती पूर्ण करा.
Acceptance is first step towards improvement.

जगभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

मनावर नियंत्रण ठेवा - लोक आत्मविश्वासाच्या अभावामुळे नैराश्यात जातात. दुसऱ्यांच्या टिप्पणीवर ते जास्त विचार करतात. चांगली संगत ठेवावी; ज्याने की आयुष्यात नेहमी नवी उमेद, नवे प्रोत्साहन मिळेल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.