ICAI CA Final Result 2022 : मुंबईच्या मित शाह देशात प्रथम

जाहीर दोन्ही ग्रुपच्या निकालामध्ये ग्रुप 1 चा निकाल 21.99 टक्के तर, ग्रुप 2 चा निकाल 21.94 टक्के लागला आहे.
CA Exam
CA ExamSakal
Updated on

नवी दिल्ली : सीएच्या (CA) पार पडलेल्या परिक्षांचा निकाल जाहीर झाला असून, मुंबईच्या मित शाहने (Mit Shaha) देशात अव्वल स्थान पटकावले आहे. 14 ते 29 मे 2022 या कालावधीत सीएची फायनल परीक्षा दोन टर्ममध्ये पार पडली होती. आज जाहीर दोन्ही ग्रुपच्या निकालामध्ये ग्रुप 1 चा निकाल 21.99 टक्के तर, ग्रुप 2 चा निकाल 21.94 टक्के लागला आहे. विद्यार्थांना हा निकाल ICAI च्या अधिकृत वेबसाइटवर बघता येणार आहे. (CA Exam 2022 Result News In Marathi)

CA Exam
'त्या' विधानाबद्दल केसरकरांकडून शरद पवारांची जाहीर माफी; म्हणाले...

असा बघा निकाल

ज्या विद्यार्थ्यांनी सीएची अंतिम परीक्षा दिली होती ते विद्यार्थी icai.nic.in, caresults.icai.org आणि icaiexam.icai.org वर जाऊन पाहू शकणार आहे. यासाठी विद्यार्थ्यांना रोल नंबरसह त्यांचा नोंदणी क्रमांक किंवा पिन वापरून लॉग इन करावे लागणार आहे.

या पद्धतीने बघता येणार परीक्षेचा निकाल

सर्वप्रथम icai.nic.in या अधिकृत वेबसाइटवर भेट द्या. त्यानंतर वेबसाइटवर दिलेल्या "ICAI CA MAY 2022 RESULT" या लिंकवर क्लिक करा. यानंतर रोल नंबरसह तुमचा नोंदणी क्रमांक किंवा पिन सबमिट केल्यानंतर तुम्हाला तुमचा निकाल स्क्रिनवर दिसून येईल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.