Career Development Tips : करिअरमध्ये यशस्वी होण्यासाठी आपण उत्तम शिक्षण घेतो, विविध प्रकारच्या स्किल्स शिकतो आणि नोकरी मिळवतो. परंतु, नोकरी मिळाली म्हणजे आपण करिअरमध्ये यशस्वी झालो का? तर याचे उत्तर नाही असे आहे. फक्त नोकरी मिळवली म्हणजे करिअर यशस्वी झाले असे होत नाही.
करिअरमध्ये यशस्वी होण्यासाठी तुम्हाला तुमच्या पुस्तकी ज्ञानासोबत इतर गोष्टींचे ज्ञान अवगत असणे आवश्यक आहे. फक्त या पुस्तकी ज्ञानाच्या मदतीने तुम्ही आयुष्य चांगल्या प्रकारे जगू शकत नाही. पुस्तकी ज्ञान हे तुम्हाला नोकरीसारखा प्लॅटफॉर्म मिळवून देऊ शकते. बाकी त्या प्लॅटफॉर्मवर चांगला परफॉर्मन्स कसा द्यायचा ? हे सर्व तुमच्या हातात आहे.
करिअरमध्ये डेव्हलपमेंट किंवा करिअर यशस्वी करण्यासाठी या पुस्तकी ज्ञानासोबतच काही महत्वाच्या गोष्टींचे ज्ञान असणे आवश्यक आहे. चला तर मग जाणून घेऊयात काही टिप्स, ज्या तुम्हाला यशस्वी करिअर करण्यासाठी महत्वाच्या ठरतील.
आजकाल सर्वच क्षेत्रांमध्ये स्पर्धा वाढली आहे. तंत्रज्ञानामध्ये आणि विविध प्रकारच्या स्किल्समध्ये नव्याने भर पडत आहे. त्यामुळे, या सर्व गोष्टी शिकून घेणे आणि टेक्नोफ्रेंडली असणे हे फार महत्वाचे आहे.
तुम्ही कोणत्याही क्षेत्रात असला तरी त्या क्षेत्राशी संबंधित असलेल्या टेक्नॉलॉजीचे तुम्हाला ज्ञान अवगत असणे आवश्यक आहे. त्यामुळे, तुम्ही टेक्नोफ्रेंडली असणे महत्वाचे आहे. याचा फायदा तुम्हाला करिअरमध्ये यशस्वी होण्यासाठी नक्की होईल.
आधीसारखा काळ आता राहिला नाही. आधी फक्त पुस्तकी किडा असणाऱ्या लोकांना नोकरी मिळायची. आता तसे राहिले नाही. फक्त डिगरी करून आणि ज्ञान मिळवून करिअर घडवता येत नाही.
आता डिगरीसोबतच तुम्हाला कोणत्या स्किल्स अवगत आहेत? आणि तुमच्याकडे कोणते टॅलेंट किंवा प्रतिभा आहे? हे पाहिले जाते. जर तुम्हाला खरच उत्तम करिअर घडवायचे असेल तर तुम्हाला स्वत:मध्ये डोकावून पाहण्याची आणि तुमची प्रतिभा शोधण्याची खरी गरज आहे.
तुमच्यामध्ये असलेल्या प्रतिभेला जागे करा आणि तज्ज्ञांच्या मदतीने त्यावर काम करा. मग बघा तुमच्या यशस्वी करिअरला कसे पैलू पडतात ते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.