सध्या अनेकांकडे नोकरी नसल्याने चिंतेत आहेत. त्यातच कोरोना काळात हजारो लोकांना आपली नोकरी गमवावी लागली, काहींचे वेतन कपात झाले तर काहींची निवड लांबणीवर पडली. अशावेळी रोजगाराची निवड करणे कठीण झाले आहे. बाजारातील, व्यवहारातील बदलता ट्रेंड लक्षात घेऊन त्याचे आकलन केल्यास रोजगार उपलब्ध होऊ शकतो. मात्र, त्यासाठी आपणांकडून प्रयत्न होणे आवश्यक आहे. (Career Opportunities Are Available In This Field Education Job News)
सध्या अनेकांकडे नोकरी नसल्याने सर्वच जण चिंतेत आहेत. त्यातच कोरोना काळात हजारो लोकांना आपली नोकरी गमवावी लागली, काहींचे वेतन कपात झाले तर काहींची निवड लांबणीवर पडली.
डिजिटल मार्केटिंग (Digital Marketing) : आपण पाहतो ऑनलाइनवर विविध प्रकारच्या सुविधा उपलब्ध झाल्या आहेत. एका ऑनलाइन प्लॅटफॉर्मवर वस्तू आणि सेवांची खरेदी व विक्री वाढवण्याची जबाबदारी डिजिटल मार्केटिंग प्रोफेशनल्सवर असते. या ठिकाणी उमेदवार हा डिजिटल मार्केटिंग स्पेशालिस्ट, सोशल मीडिया मॅनेजर्स, मार्केटिंग रिप्रेझेटेटिव्ह, सर्च इंजिन ऑप्टिमायजेशन स्पेशालिस्ट म्हणून काम करू शकतो. या उद्योगात येण्यासाठी प्रॉडक्ट मार्केटिंग, डिजिटल स्ट्रॅटर्जी, ब्रांड मॅनेजमेंटचे स्किल असणे गरजेचे आहे.
मेंटल हेल्थ स्पेशलायझेशन (Mental Health Specialization) : कोरोना संकट, नोकरीची भीती, करिअरची भीती या सावटाखाली वावरणार्या मंडळींना मानसिक आरोग्याबाबत जागरुक करणे आणि त्यांना मदत करणे गरजेचे आहे. या अनुषंगाने सध्याच्या काळात मेंटल हेल्थ प्रोफेशनल्स जसे की बिहेवियरल थेरेपिस्ट, सायकोथेरेपिस्ट, सायक्याट्रिट आदींची मागणी वाढली आहे. त्यामुळे यात देखील करिअरच्या खूप संधी उपलब्ध आहेत.
डेटा सायन्स (Data Science) : सध्या अनेक कंपन्या, संघटना, संस्था, पक्ष या घटकांना डेटा गोळा करणे आणि त्याचे विश्लेषण करण्याची गरज भासत आहे. या कामासाठी डेटा सायंटिस्ट आणि डेटा मॅनेजमेंट अॅनालिस्टची आवश्यकता असते. हे तज्ज्ञ डेटा गोळा करून निष्कर्ष काढतात आणि त्यानुसार रणनीती आखण्याचे काम करतात. या क्षेत्रात टेन्सर फ्लो, स्ट्रॅटिस्टिकल मॉडेलिंग आणि डेटा व्हिज्युलायझेशन करणार्या कौशल्यप्राप्त उमेदवाराची गरज भासते. अशा क्षेत्रात उमेदवारांकडे विशेष कौशल्य असणे गरजेचे आहे.
कम्प्युटेशन बायोलॉजी (Computational Biology) : बायोलॉजिकल, इकोलॉजिक, बिहेवियरल आणि सोशल सिस्टिमला चांगल्यारीतीने आकलन करण्यासाठी कम्प्युटेशन बायोलॉजिस्ट साहाय्यभूत ठरतात. कम्प्युटेशनल बायोलॉजिस्ट हे तंत्रादरम्यानचे संबंध चांगल्यारीतीने समजण्यासाठी एल्गोरिदम आणि मॉडेल्स तयार करतात. या क्षेत्रात काम करण्यासाठी युवकांकडे डेटा अॅनालिटिक्स, कॉम्प्युटर सायन्स, मॅथेमेटिकल अँड स्टॅटिस्टिकल मॉडेलिंगचे कौशल्य असणे गरजेचे आहे.
ई-कॉमर्स (E-commerce) : सध्याच्या काळात बहुतांश व्यवहार, व्यापार ऑनलाईन होत आहेत. त्यामुळे यात ई-कॉमर्स बिझनेस असोसिएटस्, सप्लाय चेन असोसिएटस्, पॅकेज हँडलर्स, पर्सनल शॉपर्स आदींना खूप मागणी आहे. या क्षेत्रात शिक्षणापासून ते अन्य काही बॅंकींग व्यवहार हे ऑनलाइनच केले जात आहेत. यातही आपण करिअरची संधी शोधू शकता.
यूजर इंटरफेस आणि यूजर एक्सपिरियन्स डिझाईन (User interface and User Experience Design) : जोपर्यंत ब्रँड नेम आणि क्लाइंट तयार होत नाही, तोपर्यंत कंपनीची वाटचाल खडतरच असते. या आधारावर यूआय आणि यूएक्स डिझाइनर्स जसे की प्रॉडक्ट डिझाईन कन्सल्टंट, यूजर एक्सपिरीयन्स रिसर्चर उपयुक्त ठरतात.
हेल्थकेअर अँड मॅनेजमेंट (Healthcare and Management) : सध्याच्या काळात आरोग्य क्षेत्रात काम करण्यासाठी उमेदवारांची वाणवा आहे. यानुसार हेल्थकेअर अँड मॅनेजमेंटच्या मदतीने रोजगाराची संधी शोधायला हवी. हेल्थकेअर प्रोफेशनल्स सपोर्टिंग म्हणजेच साहाय्यक स्टाफ असतात. रुग्णालय आणि डॉक्टरांना सातत्याने हेल्थकेअर असिस्टंट, फार्मसी टेक्निशियन, डेंटल असिस्टंट, होम हेल्थ अॅड आदींची गरज भासते.
ई-एज्युकेशन (E-education) : शिक्षण आता ऑनलाईन आणि व्हर्च्युअल सेटिंग्जमध्ये होत आहे. या क्षेत्रासाठी प्रोफेशनल्स जसे की टिचिंग असिस्टंट, स्कूल टीचर्स, प्रोफेसर्स आणि करिकुलम डेव्हलपर्सची मागणी वाढत चालली आहे. त्याचबरोबर यात डिजिटल स्ट्रॅटर्जी, लेसन प्लॅनिंग टाईम मॅनेजमेंटदेखील अपेक्षित आहे.
टेक्नॉलॉजी (Technology) : ऑनलाईन काम करण्याच्या स्थितीने रोजगाराच्या अनेक संधी उपलब्ध झाल्या आहेत. जसे की ब्लॉक चेन, सायबर सिक्युरिटी, एथिकल हॅकिंग आदी. साहजिकच, या प्रोफेशनल्सला प्रोग्रॅम मॅनेजमेंट, वेब डेव्हलपमेंट, डिस्ट्रिब्युटेड सिस्टिम आदींची माहिती असणे गरजेचे आहे.
वर्कप्लेस डायव्हर्सिटी मॅनेजमेंट (Workplace Diversity Management) : अनेक देशांतील परस्पर व्यापार आणि जागतिकीकरणामुळे जग एका सूत्रात बांधले गेले आहे. या आधारे कार्यक्षेत्राचा विस्तार झाला आहे आणि कर्मचार्यांत वैविध्यता आली आहे. या कारणांमुळे वर्कप्लेस डायव्हर्सिटी मॅनेजर्स डायव्हर्सिटी ऑफिसर्स, डायव्हर्सिटी कोऑर्डिनेटर्सची गरज वाढली आहे.
Career Opportunities Are Available In This Field Education Job News
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.