'12th sci' च्या विद्यार्थ्यांना संधी, सर्वच क्षेत्रात करीअरला वाव

student
studente sakal
Updated on

नागपूर : विज्ञान तंत्रज्ञानाने आज संपूर्ण जग जवळ आले आहे. त्यामुळे बारावी विज्ञान (12th science) अभ्यासक्रमातून उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्याला अनेक अभ्यासक्रमात प्रवेशाच्या संधी (career opportunities for 12th science sutdent) उपलब्ध आहेत. अभियांत्रिकी आणि वैद्यकीय क्षेत्रच नव्हे तर आपल्या अभ्यासक्रमाच्या भरवशावर तो इतरही क्षेत्र पादाक्रांत करण्याची क्षमता ठेवू शकतो.

student
HSC Result 2021 : बारावीचा निकाल आज, कसा अन् कुठे पाहाल?

बारावी हा विद्यार्थ्यांच्या जीवनातला एक खूप महत्त्वाचा टप्पा आहे. बारावीनंतर घेतलेले अभ्यासक्रम भविष्यात विद्यार्थ्याच्या कारकिर्दीचा पाया रचतात. म्हणूनच, विद्यार्थ्यांना करिअरच्या महत्त्वपूर्ण पर्यायांची माहिती असणे आवश्यक आहे. बहुतेक लोकांना केवळ बारावी सायन्स नंतरच्या अभियांत्रिकी आणि वैद्यकीय अभ्यासक्रमांबद्दल माहिती असते. पण बारावी सायन्सअनंतर अभियांत्रिकी व वैद्यकीय अभ्यासक्रमांशिवाय बरेच पर्याय उपलब्ध आहेत. विज्ञान तंत्रज्ञानच नव्हे तर बारावीनंतर विज्ञान आणि वाणिज्य शाखेतले करिअरचे अनेक पर्याय आहेत.

अभियांत्रिकीमध्ये गेल्या दोन वर्षांमध्ये अनेक नव्या अभ्यासक्रमांची भर पडली आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांचा ओढा या अभ्यासक्रमांकडे वाढला आहे. मात्र, त्यामुळे इतर अभियांत्रिकी शाखांचे महत्त्व कमी होईल असे म्हणता येणार नाही.
डॉ. एस.व्ही. गोळे, प्राचार्य, सेंट पलोटी अभियांत्रिकी महाविद्यालय

१२ वी नंतर विज्ञान (पीसीएम) कोर्स पर्याय -

  • अभियांत्रिकी (बीटेक / बीई)

  • एरोनॉटिकल अभियांत्रिकी

  • ऑटोमोबाईल अभियांत्रिकी

  • सिव्हिल अभियांत्रिकी

  • इलेक्ट्रॉनिक्स व कम्युनिकेशन अभियांत्रिकी

  • औद्योगिक अभियांत्रिकी

  • विद्युत अभियांत्रिकी

  • डेअरी तंत्रज्ञान

  • मेकॅनिकल इंजिनिअरिंग

  • आर्किटेक्चर

  • कॉम्प्युटर अॅप्लिकेशन

  • मर्चंट नेव्ही

  • नॉटिकल टेक्नॉलॉजी मधील बी.एसस्सी

  • नॅव्हल आर्किटेक्चर अँड शिपबिल्डिंग मधील बी.टेक

  • आर्टिफिशिअल इंटेलिजन्स

  • मशीन लर्निंग

बी.एसस्सी अभ्यासक्रम

भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, गणित, जीवशास्त्र, खगोलशास्त्र, फॉरेन्सिक विज्ञान, भूविज्ञान, कृषी, माहिती तंत्रज्ञान, सांख्यिकी, औद्योगिक रसायनशास्त्र, फॅशन तंत्रज्ञान, होमसायन्स, न्यूट्रिशन, क्लोदिंग अँट टेक्स्टाईल, एक्स्टेंशन आणि कम्युनिकेशन, समुद्री विज्ञान, मानव विकास आणि कौटुंबिक अभ्यास, फॅशन डिझाइन, पर्यावरण विज्ञान इत्यादी विषयातील बी.एसस्सी.

व्यावसायिक पायलट

एव्हिएशन विज्ञानमधील बीएस्सी

बारावी विज्ञान (पीसीबी) कोर्सेस

  • एमबीबीएस

  • दंतचिकित्सा (बीडीएस)

  • बीएएमएस-आयुर्वेद

  • बी.एच.एम.एस.-होमिओपॅथी

  • बीयूएमएस - यूनानी

  • बीएनवायएस - निसर्गोपचार आणि योगिक विज्ञान

  • बीएसएमएस - सिद्ध चिकित्सा व विज्ञान

  • पशुवैद्यकीय सेवा व पशुसंवर्धन

  • फिजिओथेरपिस्ट

  • बीएस्सी व्यावसायिक थेरेपिस्ट

  • बीएस्सी न्यूट्रिशन अँड डायटिटिक्स

  • इंटिग्रेटेड एमएससी

  • बीएस्सी- बायोटेक्नॉलॉजी

  • बीएस्सी (दुग्ध तंत्रज्ञान / नर्सिंग / रेडिओलॉजी / प्रोस्थेटिक्स आणि ऑर्थोटिक्स, ऑप्टोमेट्री)

  • बीएस्सी स्पीच अँड लॅँग्वेज पॅथॉलॉजी

  • बीएस्सी अँथ्रोपॉलॉजी

  • बीएस्सी रेडियोग्राफी

  • बीएस्सी पुनर्वसन थेरपी

  • बीएस्सी फूड टेक्नोलॉजी

  • बीएस्सी हॉर्टिकल्चर

  • बीएस्सी होम सायन्स / न्यायवैद्यक

  • बॅचलर ऑफ फार्मसी

  • बीएमएलटी (मेडिकल लॅब टेक्नॉलॉजी)

  • बीओटी (ऑक्युपेशनल थेरपी)

डिप्लोमा कोर्सेस

  • न्यूट्रिशन अँड डायटिटिक्स

  • डिप्लोमा नर्सिंग

  • टेक्स्टाईल डिझाईनिंग

  • डिप्लोमा इन कॉम्प्युटर इंजिनिअरिंग

  • डिप्लोमा इन वेब डिझाइन

  • डिप्लोमा इन फॅशन डिझायनिंग

  • सिव्हिल इंजिनिअरिंग

  • इन्फर्मेशन टेक्नॉलॉजी

  • ड्रॉइंग अँड पेंटिंग

  • डिप्लोमा इन ड्रेस डिझायनिंग

  • डिप्लोमा कॉम्प्युटर हार्डवेअर

  • डिप्लोमा इन अॅनिमेशन अँड मल्टिमीडिया

  • डिप्लोमा (एअर होस्टेस, क्रू)

  • डिप्लोमा इन इव्हेंट मॅनेजमेंट

  • केमिकल इंजिनिअरिंग

  • सॉफ्टवेअर अँड नेटवर्किंग

  • फॉरेन लँग्वेज

गेम डिझाईन पदवी

  • बी.एस्सी. इन डिझाइन

  • प्रिंटींग टेक्नॉलॉजी पदवी

  • बॅचलर ऑफ ॲनिमेशन ॲण्ड मल्टिमीडिया

  • सर्टिफिकेट इन ग्राफिक, वेब डिझाईन ॲण्ड डेव्हलपमेंट

  • प्रोग्राम इन ग्राफिक ॲण्ड वेब

  • डिप्लोमा इन ग्राफिक डिझाइन ॲण्ड मोशन ग्राफिक

  • सर्टिफिकेट इन व्हिडिओ एडिटिंग

  • डिप्लोमा इन गेम डिझाइन ॲण्ड इंटिग्रेशन

  • सर्टिफिकेट इन वेब डिझाइन

  • ॲनिमेशन फिल्म डिझाइन

  • सर्टिफिकेट इन टी.व्ही. ग्राफिक ॲण्ड ॲनिमेशन

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.