ITI Course: 10th, 12th विद्यार्थ्यांनी ITI कोर्स करण्याचे 5 फायदे, हा डिप्लोमा कोर्स कसा फायद्यचा ते समजून घ्या

ITI Course Information: आयटीआयचा डिप्लोमा कोर्स करण्याचे फायदे थोडक्यात समजून घेऊया.
10th,12th Pass Career Opportunity
10th,12th Pass Career Opportunityesakal
Updated on

10th,12th Pass Career Opportunity : सगळ्यात राज्यांचा बोर्डाचा दहावी आणि बारावीचा निकाल लागलेला असून आता १० वी १२ वी नंतर पुढे काय असा प्रश्न विद्यार्थ्यांच्या मनात निर्माण झालाय.

निकालानंतर नेमकं कुठल्या क्षेत्रात करियर बनवायचं असा विचार विद्यार्थी करताय. अशात आयटीआय केल्यास तुम्ही भविष्यात करियर घडवण्यासाठीच्या उत्तम संधी मिळू् शकतील. चला तर आयटीआयचा डिप्लोमा कोर्स करण्याचे फायदे थोडक्यात समजून घेऊया.

रेल्वे आणि सैन्य क्षेत्रात उत्तम करियर बनवू शकता

आयटीआय केल्यानंतर विद्यार्थ्यांना रेल्वे, आर्मी, नेव्ही, एअरफोर्स, पीडब्ल्यूडी, पाटबंधारे, व्यावसायिक शिक्षण विभाग, तंत्रशिक्षण विभाग इ. सरकारी क्षेत्रात करिअर करता येते.

कारण वेळोवेळी हे विभाग आयटीआय पदविकाधारकांना नोकरीच्या संधी देत ​​असतात.

10th,12th Pass Career Opportunity
10th,12th Pass Career Opportunity

अनेक पोलिस विभागांतही नोकरी मिळते

लष्कराव्यतिरिक्त, आयटीआय पास उमेदवारांना अनेक पोलिस खात्यांमध्येही नोकरी मिळू शकते. कारण अनेक राज्यांकडून आयटीआय उमेदवारांना तांत्रिक विभागातही नियुक्त केले जाते.

ITI केल्यानंतर, उमेदवार BHEAL, UPPCL, डिफेन्स फॅक्टरी, HMT, HAL, SAIL, GAIL, ONGC, NTPC इत्यादी सेमी गव्हर्नमेंट/कॉर्पोरेट/परिषद क्षेत्रातही करिअर करू शकतात. या ठिकाणी वेळोवेळी नोकरीसाठी जागा निघतात. (Education)

10th,12th Pass Career Opportunity
Career Planning: दहावीनंतरच्या करिअरसाठी 'हे' आहेत १० बेस्ट पर्याय

टाटा मोटर्स, सुझुकीमध्ये सुद्धा नोकरीची संधी

आयटीआय केल्यानंतर विद्यार्थ्यांना टाटा मोटर्स, मारुती सुझुकी, ह्युंदाई, एस्कॉर्ट्स, रिलायन्स, आदित्य बिर्ला, होंडा, एस्सार, एल अँड टी, आयटीसी, महिंद्रा अँड महिंद्रा, जिंदाल, विप्रो, इन्फोसिस, व्हिडिओकॉन आदी खासगी संस्थांमध्ये करिअर करता येते. येथे आयटीआय पास उमेदवारांसाठी वेळोवेळी नोकऱ्यांची भर्ती निघते. (Career)

10th,12th Pass Career Opportunity
Career Tips : बारावीनंतर बनू शकता एअर होस्टेस! काय असतं काम, किती मिळतो पगार? जाणून घ्या

आयटीआय विद्यार्थी स्वत:चा बिजनेसही सुरु करू शकतात

आयटीआय प्रशिक्षणानंतर विद्यार्थी स्वत:चा व्यवसायही सुरू करू शकतात. कारण आयटीआय करताना स्टार्टअप्सही शिकवले जातात. तसेच ITIT पास उमेदवारांना कोणत्याही हमीशिवाय सहज रोजगार मिळतो.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.