‘मटेरिअल सायन्स’मधील करिअर

भारतात अभियांत्रिकीमध्ये प्रवेश मिळविण्यासाठी सीईटी आणि जेईई प्रवेश परीक्षांमध्ये चांगले गुण मिळविल्यास प्रतिष्ठित शैक्षणिक संस्थांचे दरवाजे उघडतात आणि उज्ज्वल करिअर घडू शकते.
career option in b tech in material science and engineering
career option in b tech in material science and engineeringSakal
Updated on

- दीपाली कुलकर्णी

बारावी पूर्ण केल्यानंतर करिअरचा मार्ग निवडणे हा एक आव्हानात्मक निर्णय असतो. अभियांत्रिकी क्षेत्रात स्वारस्य असलेल्या विद्यार्थ्यांसाठी बी. टेक. इन मटेरिअल सायन्स अँड इंजिनिअरिंग हे अनेक संधी उपलब्ध करून देणारे क्षेत्र ठरते आहे.

भारतात अभियांत्रिकीमध्ये प्रवेश मिळविण्यासाठी सीईटी आणि जेईई प्रवेश परीक्षांमध्ये चांगले गुण मिळविल्यास प्रतिष्ठित शैक्षणिक संस्थांचे दरवाजे उघडतात आणि उज्ज्वल करिअर घडू शकते.

मटेरिअल सायन्स इंजिनिअरिंगमध्ये (एमएसई) बी. टेक. हा एक विशेष पदवी कार्यक्रम आहे, जो विविध क्षेत्रांतील मटेरिअल आणि त्यांच्या अनुप्रयोगांच्या अभ्यासावर लक्ष केंद्रित करतो. ‘एसएसई’मध्ये बी. टेक. करणे फायदेशीर ठरते. कारण -

स्वरूप

मटेरिअल सायन्समध्ये भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र आणि अभियांत्रिकी या घटकांचा समावेश आहे. विद्यार्थी सामग्रीची रचना, गुणधर्म, प्रक्रिया समजून घेण्यास शिकतात. त्यामुळे त्यांच्या ज्ञानाचा परीघ विस्तारतो.

अष्टपैलू करिअर

मटेरिअल सायन्स आणि अभियांत्रिकी पदवीधरांकडे एरोस्पेस, ऑटोमोटिव्ह, इलेक्ट्रॉनिक्स, ऊर्जा, आरोग्यसेवा आणि उत्पादन यांसारख्या उद्योगांमधील विविध प्रकारचे करिअर पर्याय उपलब्ध आहेत. ते संशोधन आणि विकास, डिझाइन, गुणवत्ता नियंत्रण आणि प्रक्रिया यांमध्ये काम करू शकतात.

नावीन्य आणि प्रगती

तंत्रज्ञान विकसित होत असल्याने कार्यक्षमतेसह नवीन सामग्रीची मागणी वाढत असते. त्यामुळे हे पदवीधर नावीन्यपूर्ण मटेरिअल आणि तंत्रज्ञान विकसित करण्यात आघाडीवर राहू शकतात. त्यामुळे विविध उद्योगांमधील प्रगतीमध्ये ते योगदान देतात. त्यांचेही करिअर घडते.

पर्यावरणविषयक प्रश्‍न

वाढत्या पर्यावरणीय जागरूकतेसह टिकाऊ साहित्य आणि उत्पादन प्रक्रिया विकसित करण्यावर भर दिला जात आहे. त्यामुळे शाश्वत मटेरिअल आणि ग्रीन मॅन्युफॅक्चरिंग पद्धतींशी संबंधिक घटकांचा अभ्यासक्रमात समावेश केला जातो. विद्यार्थ्यांना या आव्हानांना तोंड देण्यासाठी तयार केले जाते.

नोकरीची सुरक्षितता

तांत्रिक प्रगतीमुळे विशिष्ट गुणधर्मांच्या मटेरिअलची मागणी सातत्याने होत आहे. त्यामुळे या क्षेत्रातील पदवीधरांना नोकरीच्या अनुकूल संधी आणि सुरक्षितताही मिळू शकते.

संशोधन

एमएसईमुळे अनेक विद्यार्थ्यांना संशोधन प्रकल्पांमध्ये काम करण्याची संधी मिळते. इंटर्नशिप, पदवीपूर्व संशोधन कार्यक्रम किंवा प्राध्यापकांसह सहयोगी प्रकल्प केल्याने अनुभव मिळतो. हा अनुभव विद्यार्थ्यांना व्यावहारिक कौशल्ये प्राप्त करण्यास आणि विशिष्ट क्षेत्रांमध्ये त्यांची आवड टिकवून ठेवण्याची, त्यात काम करण्याची संधी देतो.

जागतिक बाजारपेठ

मटेरिअल सायन्स आणि अभियांत्रिकी हे जागतिक स्तराशी संबंधित असलेले क्षेत्र आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी योग्य त्या दिशेने संशोधन व कार्य सुरू ठेवल्यास त्यांना आंतरराष्ट्रीय संधीही उपलब्ध होऊ शकतात.

भारतात आणि जगभरात मटेरिअल सायन्स आणि इंजिनिअरिंगमधील अभ्यासक्रमाला प्रवेश देणाऱ्या अनेक नामांकित संस्था आहेत. आपले उज्ज्वल भविष्य घडवण्यासाठी आपणही या अभ्यासक्रमाचा विचार करायला हवा.

(लेखिका एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटी, पुणेच्या रासायनिक अभियांत्रिकी विभागात कार्यरत आहेत.)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.