Career Tips : बारावीनंतर पुढे काय, करिअर ठरलं तरी सर्वोत्तम कॉलेज कसे निवडावे?

खरं तर कॉलेज निवडताना वेगवेगळे घटक विचारात घेतले जातात
Career Tips
Career Tips esakal
Updated on

Career Tips : प्रत्येक विद्यार्थ्यांसाठी करिअर खूप महत्वाचे असते. विद्यार्थी त्यांच्या क्षमतेनुसार त्यांचे करिअर निवडतात. बहुतेक विद्यार्थी विविध परीक्षांमध्ये यशस्वी होण्यासाठी परीक्षेच्या तयारीत व्यस्त असतात.

काही विद्यार्थी स्वप्नातील नोकरी मिळविण्यासाठी परीक्षेची तयारी करतात. काही देशातील सर्वोच्च संस्थांमध्ये प्रवेश मिळविण्यासाठी परीक्षा देतात. या परीक्षांमध्ये यश मिळविण्यासाठी विद्यार्थी परिश्रमपूर्वक अभ्यास करतात. कठोर परिश्रमानंतर विद्यार्थ्यांना यश मिळते.

रिझल्ट हातात आल्यावर आत्ता पुढे काय हा प्रश्न प्रत्येकाच्या आयुष्यात येतो. करिअर निवडण्याचा निर्णय हा खुप महत्त्वाचा निर्णय असतो. त्यामुळे मुलं आणि पालक गोंधळून जातात. पण तुमच्याही घरात मुलं करिअर काय निवडावं या गोंधळात असतील तर ही बातमी कामाची आहे.

या प्रश्नाचे एकच उत्तर असू शकत नाही. खरं तर कॉलेज निवडताना वेगवेगळे घटक विचारात घेतले जातात - कोर्स, बारावीचे गुण, कॉलेजचे लोकेशन, बजेट, करिअरउद्दिष्ट इ. प्रत्येकाची स्वतःची प्राथमिकता असते आणि त्याआधारे ते आपलं कॉलेज निवडतात.

Career Tips
Career Opportunities : दादरमधील शासकीय मुलींच्या आयटीआयमध्ये नाविन्यपूर्ण ट्रेड, देशभरात करिअरची संधी

शाळांप्रमाणेच कॉलेजांनाही मान्यता आहे. महाविद्यालये आणि विद्यापीठे तेथे शिकविल्या जाणाऱ्या अभ्यासक्रमांच्या आधारे मान्यता मिळवतात. कॉलेज निवडण्यापूर्वी ते कुठे मान्यताप्राप्त आहे आणि त्याचे रँकिंग काय आहे हे तपासा. अनेक नामांकित महाविद्यालयेही मान्यता न घेता वर्षानुवर्षे सुरू आहेत. तिथल्या डिग्रीचा काहीउपयोग नाही.

बारावीनंतर काय करावे

बारावीनंतर काय करावे? या प्रश्नाचे स्पष्ट उत्तर मिळाल्यानंतरच आपल्या कॉलेजांची यादी तयार करा. कोणतेही कॉलेज निवडताना कोणता अभ्यासक्रम किती समर्पक आहे हे नक्की तपासून पहा. अनेकदा चांगल्या कॉलेजांमधून केलेल्या अभ्यासक्रमांना विशेष मान्यता नसते. फॅकल्टी, सुविधा (लॅब/प्रॅक्टिकल वर्क) आणि मागील वर्षांचे निकाल आणि प्लेसमेंट रेकॉर्ड ्स आधीच तपासून घेणे चांगले.

कॉलेज फॅकल्टी

कॉलेजमध्ये रुजू होण्याआधी तिथल्या फॅकल्टीबद्दल सहज माहिती घेता येते. शिक्षकांची माहिती सोशल मीडिया ग्रुप्स किंवा कॉलेजच्या वरिष्ठांकडून किंवा उत्तीर्ण विद्यार्थ्यांकडून गोळा केली जाऊ शकते. एखाद्या कॉलेजच्या फॅकल्टीबाबत काही नकारात्मक माहिती असेल तर तिथे अॅडमिशन घेणे टाळावे. या सर्व बाबींबरोबरच कॉलेजचे ठिकाण आणि वसतिगृहाची सुविधा जाणून घ्या.

Career Tips
Career Selection : पालकांनो मुलांनाच ठरवू द्या भविष्याची दिशा; अन्यथा होईल दुर्दशा...!

12वी नंतर सायन्ससाठीचे ऑप्सन्स

Engineering

Aeronautical Engineering

Automobile Engineering

Civil Engineering

Electronics and Communication Engineering

Industrial Engineering

Information Technology

Instrumentation and Control Engineering

Chemical Engineering

Mining Engineering

Electrical and Electronics Engineering

Marine Engineering

Print and Media Technology

B.Com नंतर जॉब प्रोफाइल

  1. Accountant

  2. Banker

  3. Tax consultant

  4. Finance Consultant

  5. MBA

  6. M.Com

  7. ACCA, CFA

  8. CA, CS

Career Tips
Psychology Career : मानसशास्त्रात करिअर करायचंय? आहेत हे 7 पर्याय

12 आर्ट्सनंतरचे करिअर ऑप्शन्स

Air Hostess

Animation

ATD

AUTOCAD

B.Voc

B.Com

B.Ed

BA

BAF

BBA

BBI

BCA

Beauty Parlour

BMM

BMS

BSW

Data Entry Operator

Digital Marketing

DMLT

DTP (Desktop Publishing)

Event Management

Fire Brigade

Fire Safety

Gram Sevak

Graphic Design

Hotel Management

ICWA

Import Export

ITI

Journalism

LLB

Makeup Artist

Mass Communication

Montessori

NDA

Photography

Tally Course

Tours And Travels

VFX

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.