Career Tips: लहान मुलांच्या सहवासात राहायला आवडत असेल तर या क्षेत्रात करा करिअर

या क्षेत्रात करिअर करून तुम्ही चांगली कमाई करू शकता.
Career Tips
Career Tipssakal
Updated on

करिअरच्या पर्यायाबाबत प्रत्येक व्यक्तीची विचारसरणी वेगळी असते. सामान्यतः लोकांना असे क्षेत्र निवडणे आवडते ज्यामध्ये त्यांची ग्रोथ चांगली असेल आणि त्यांना चांगली कमाई करता येईल. तुम्हाला जर लहान मुलांच्या सहवासात राहायला आवडत असेल तर तुमच्यासाठी अनके पर्याय आहेत.चला तर मग जाणून घेऊया ते कोणते पर्याय आहेत.

आज अशी अनेक क्षेत्रे आहेत जी तुम्हाला मुलांसोबत काम करण्याची संधी देतात. या क्षेत्रात करिअर करून तुम्ही चांगली कमाई करू शकता तर आज आम्ही तुम्हाला अशाच काही क्षेत्रांबद्दल सांगत आहोत.

शिक्षक

जर तुम्हाला मुलांवर खूप प्रेम असेल आणि त्यांच्यासोबत जास्त वेळ घालवायचा असेल तर तुम्ही शिक्षक म्हणून तुमच्या करिअरचाही विचार करू शकता. एक शिक्षक वेगवेगळ्या वयोगटातील मुलांना शिकवतो. शिकवताना तुमचा सुरुवातीचा पगार थोडा कमी असेल, पण अनुभवाने तुमचा पगार वाढतच जातो.

डे केअर सेंटर

हे असे क्षेत्र आहे ज्याची मागणी शहरी भागात वाढत आहे. आज बहुतांश महिला नोकरी करत असल्याने त्यांना आपले मूल सुरक्षित हातात सोपवायचे आहे. अशा स्थितीत डे केअर सेंटरची मागणी मोठ्या प्रमाणात वाढू लागली आहे.

स्वत:साठी काही करायचे असेल तर डे केअर सेंटर सुरू करता येईल. यामध्ये तुम्हाला तुमचा संपूर्ण दिवस मुलांसोबत घालवण्याची संधी मिळेल. तुम्ही डे केअर सेंटर उघडू शकत नसल्यास, तुम्ही तिथे नोकरीसाठी अर्जही करू शकता.

Career Tips
Career Options for Arts Stream: कला शाखेचे विद्यार्थी या क्षेत्रात करू शकतात करिअर, दरमहा होईल लाखोंची कमाई

बालरोगतज्ञ

बालरोगतज्ञांचे कार्य मुलांशी संबंधित आहे. हे स्पेशलाइज्ड डॉक्टर असतात, जे मुलांच्या आरोग्याची काळजी घेण्यात महत्त्वाची भूमिका बजावतात. जर तुम्हाला वैद्यकीय क्षेत्रात जायचे असेल आणि तुम्हाला मुलांबद्दल विशेष प्रेम असेल, तर तुम्ही बालरोगतज्ञ म्हणून तुमचे करिअर करण्याचा विचार करू शकता. बालरोगतज्ञांचे उत्पन्न देखील चांगले आहे, त्यामुळे तुम्हाला पैशाची काळजी करण्याची गरज नाही.

चाईल्ड साइकोलॉजिस्ट

चाईल्ड साइकोलॉजिस्ट मुलांच्या भावनिक, वर्तणूक आणि विकासाच्या समस्या चांगल्या प्रकारे समजून घेण्यास आणि त्यांचे निराकरण करण्यात खूप मदत करतात. मुलांना काउंसिलिंग देण्याबरोबरच ते कुटुंबालाही समजावण्याचा प्रयत्न करतात, जेणेकरून परिस्थिती सुधारू शकेल. चाईल्ड साइकोलॉजिस्ट

स्वतःचे क्लिनिक उघडू शकतो किंवा हॉस्पिटलमध्ये काम करू शकतो. एवढेच नाही तर आता शाळा आणि इतर शैक्षणिक केंद्रांमध्येही चाईल्ड साइकोलॉजिस्टची मागणी वाढू लागली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.