CBSE 10th Result : केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाचा (CBSE) इयत्ता दहावीचा निकाल नुकताच जाहीर करण्यात आला आहे. हा निकाल तुम्ही cbseresults.nic.in किंवा results.cbse.nic.in च्या अधिकृत वेबसाईटवर पाहू शकता.
सीबीएसई बोर्डाचा दहावीचा निकाल तुम्ही डिजिलॉकरवर देखील पाहू शकता. रिझल्ट पाहण्यासाठी विद्यार्थ्यांना रोल नंबर, शाळा क्रमांक आणि प्रवेशपत्र किंवा ओळखपत्राचा वापर करावा लागेल.
यासोबतच cbse.gov.in, digilocker.gov.in, results.gov.in, DigiLocker ॲप आणि UMANG pp इत्यादी वेबसाईट्सवर ही विद्यार्थ्यांना त्यांचा निकाल पाहता येईल.
सर्वात आधी CBSE बोर्डाची अधिकृत वेबसाईट cbseresults.nic.in ला भेट द्या.
त्यानंतर, होमपेजवर जाऊन निकाल विभागावर क्लिक करा.
आता CBSE इयत्ता १० वी वर क्लिक करा.
आता तुमचा रोल नंबर आणि शाळा क्रमांक टाईप करा.
आता तुम्हाला स्क्रिनवर CBSE बोर्ड निकाल २०२४ दिसेल.
विद्यार्थी त्यांचा निकाल तपासून झाल्यानंतर तो डाऊनलोड देखील करू शकतात.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.