CBSE Term 2 Exam 2022: परीक्षेपूर्वी बोर्डाच्या नव्या गाईडलाईन्स वाचल्यात का?

येत्या 26 एप्रिलपासून दहावी आणि बारावीच्या टर्म-2 परीक्षा सुरू होणार आहेत.
CBSE Term 2 Exam 2022
CBSE Term 2 Exam 2022esakal
Updated on

CBSE Term 2 Exam 2022: येत्या 26 एप्रिलपासून सुरू होणाऱ्या दहावी आणि बारावीच्या टर्म-2 परीक्षेसाठी नव्या आवश्यक गाईडलाईन्स जारी केल्या आहेत. या सर्व सूचना बोर्डाने सर्व सीबीएसई संलग्न शाळांना पाठवल्या आहेत. देशातील आणि राज्यातील कोरोनाच्या रूग्णांची संख्या मोठ्या प्रमाणावर कमी होत आहे. त्यामुळे नव्या गाईडलाईन्समध्ये कोरोना संबधित देण्यात आलेले नियमातही सूट देण्यात आली आहे. दरम्यान, CBSC बोर्डाकडून लवकरच 10वी आणि 12वीच्या विद्यार्थ्यांसाठी प्रवेशपत्र आणि रोल नंबर या आठवड्यात CBSE संलग्न शाळांना पाठवली जातील, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे. (CBSE Board Issue New Guidelines For Term 2 Examination)

CBSE Term 2 Exam 2022
नील सोमय्यांचादेखील अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला

अशा आहेत CBSE टर्म 2 बोर्ड परीक्षेसाठीच्या मार्गदर्शक सूचना

  • परीक्षेदरम्यान परीक्षा केंद्रावर केंद्र अधीक्षक देखरेख करतील. तसेच टर्म 2 परीक्षा दोन तासांची असेल.

  • परीक्षा सकाळी 10:30 ते 12:30 या वेळेत आयोजित करण्यात येतील. यासाठी विद्यार्थ्यांना सकाळी 9.30 पर्यंत परीक्षा केंद्रावर हजर राहावे लागेल. परीक्षा केंद्रावर सकाळी 10.00 नंतर येणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जाणार नाही.

  • सकाळी 10:00 वाजता प्रश्नपत्रिका आणि उत्तरपत्रिका वितरित केल्या जाणार असून, विद्यार्थ्यांना प्रश्नपत्रिका वाचण्यासाठी 20 मिनिटांचा वेळ दिला जाणार आहे.

  • विद्यार्थ्यांना परीक्षा हॉलमध्ये प्रवेशासाठी, प्रवेशपत्र (CBSE रोल नंबर/अ‍ॅडमिट कार्ड) दाखवावे लागणार असून, त्यावर मुख्याध्यापकांची स्वाक्षरी असणे आवश्यक आहे.

CBSE Term 2 Exam 2022
Postpone NEET UG 2022 : परीक्षा पुढे ढकलणार? सोशल मीडियावर विद्यार्थ्यांचे अजब तर्क

असे करा CBSE टर्म 2 प्रवेशपत्र डाउनलोड

अधिकृत वेबसाइट cbse.gov.in वर जा. त्यानंतर होमपेजवर दिसणार्‍या प्रवेशपत्राच्या लिंकवर क्लिक करा. यानंतर तुमचा वैयक्तिक तपशील भरून ते सबमिट करा. यानंतर स्क्रीनवर प्रवेशपत्र दिसून येईल ते डाउनलोड करावे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.