CBSE परीक्षेची मार्कशीट हरवली? मग 'या' पद्धतीने मिळवा परत

CBSE १०वी-१२वीची मार्कशीट हरवली तर काय करावं?
CBSE परीक्षेची मार्कशीट हरवली? मग 'या' पद्धतीने मिळवा परत
Updated on

कोणतीही पदवी किंवा कोर्स पूर्ण केल्यानंतर विद्यार्थ्यांना शाळा वा महाविद्यालयाकडून प्रशस्तीपत्रक आणि गुणपत्रिका ( मार्कशीट) दिले जाते. या गुणपत्रिकांपैकी १० वी आणि १२ वी ची गुणपत्रिका अत्यंत महत्त्वाची समजली जाते. कोणत्याही नव्या ठिकाणी प्रवेश घेताना किंवा ऑनलाइन एखादा फॉर्म भरताना आवर्जुन १०-१२ वीची गुणपत्रिका विचारली जाते. त्यामुळे प्रत्येक व्यक्तीकडे मार्कशीट असणं अत्यंत गरजेचं आहे. परंतु, एखाद्या वेळी तुमची गुणपत्रिका हरवली तर? खासकरुन CBSE च्या मुलांची गुणपत्रिका हरवली तर त्यांना बरीच मेहनत करुन ही गुणपत्रिका परत मिळवावी लागते. यासाठी त्यांना स्थानिक कार्यालयात जाऊन नवीन डॉक्युमेंट्ससाठी अप्लाय करावं लागतं. परंतु, आता CBSE ची मुलं घरबसल्या त्यांची हरवलेली १०वी- १२ वीची मार्कशीट सहज मिळवू शकतात. (cbse-new-portal-lost-your-marksheets-and-certificates-now-get-duplicate-copy-at-home)

CBSEच्या मुलांना आता त्यांची हरवलेली मार्कशीट परत मिळवण्यासाठी अजिबात धावपळ करण्याची गरज नाही. घरी राहूनच ते ऑनलाइन डुप्लिकेट मार्कशीट मिळवू शकतात. मुलांची हरवलेली किंवा गहाळ झालेली मार्कशीट परत मिळावी यासाठी CBSE ने डुप्लिकेट अॅकॅडमी डॉक्युमेंट सिस्टीम (DADS) हे नवीन पोर्टल सुरु केलं आहे. या नव्या पोर्टलच्या माध्यमातून मुलांना त्यांची मार्कशीट परत मिळता येणार आहे.

CBSE परीक्षेची मार्कशीट हरवली? मग 'या' पद्धतीने मिळवा परत
'तुला पाहून कोणी काम देणार नाही'

"अॅकॅडमिक डॉक्युमेंट्सची डुप्लिकेट कॉपी मिळावी यासाठी आमच्याकडे अनेक मुलांचे अर्ज येत असतात. या मुलांचे एकतर डॉक्युमेंट्स हरवले असतात किंवा खराब झालेले असतात. त्यातच कोरोना काळात मुलांना स्थानिक कार्यालयामध्ये जावं लागू नये यासाठी आम्ही हे नवीन पोर्टल सुरु केलं आहे", असं CBSE बोर्डाकडून सांगण्यात आलं.

वेळ आणि पैसा दोघांचीही बचत

"कोविड काळात मुलांना त्रास होऊ नये यासाठी आमच्या आयटी विभागाने हा सुरक्षित, जलद आणि आर्थिक समाधान मिळवणारा तोडगा काढला. यासाठी आम्ही इनहाऊस पोर्टल DADS ची सुरुवात केली. या पोर्टलच्या माध्यमातून विद्यार्थी व पालक घरबसल्या त्यांची मार्कशीट, पासिंग सर्टिफिकेट, मायग्रेशन सर्टिफिकेटची डुप्लिकेट कॉपी घेऊ शकतात, " असंही बोर्डाकडून सांगण्यात आलं.

अशा प्रकारे मिळवा हरवलेली मार्कशीट

हरवलेल्या मार्कशीटची कॉपी मिळवण्यासाठी प्रथम विद्यार्थ्यांना CBSE च्या www.cbse.nic.in या संकेतस्थळाला भेट द्यावी लागेल. त्यानंतर https://cbseit.in/cbse/web/dads/home.aspx या दुसऱ्या लिंकवर जाऊन त्यांना डुप्लिकेट मार्कशीट किंवा अन्य कागदपत्रांसाठी अप्लाय करावं लागेल. त्यानंतर रिजनल ऑफिसला हा अर्ज मिळेल व ते स्पीड पोस्टाने विद्यार्थ्यांच्या घरी डॉक्युमेंट्सची कॉपी पाठवून देतील.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()