देशात बेराजगारी ही खुप मोठी समस्या आहे मात्र मागच्या दोन वर्षांत कोव्हिडमुळे बेरोजगारीचं प्रमाण वाढलय. कोरोना काळात अनेकांनी आपली नोकरी गमावली. याशिवाय पगार कपातचाही सामना करावा लागला. मात्र आता सरकारच्या एका उपक्रमांतर्गत बेरोजगारांना कमाईची मोठी संधी मिळणार आहे.
नागरिकांचे उत्पन्न वाढवण्यासाठी तसेच बेरोजगारांना नोकरीची संधी मिळावी. यासाठी सरकारकडून विविध उपक्रम राबवण्यात येत असतात. आता असाच भारतीय जनऔषधी केंद्र नावाचा एक उपक्रम केंद्र सरकारकडून राबविण्यात येत आहे या उपक्रमाच्या माध्यमातून केंद्र सरकार तुम्हाला तुमच्या गावात, शहरात जनऔषधी केंद्र सुरू करून बेरोजगारांना चांगल्या कमाईची संधी उपलब्ध करून देत आहे. जनऔषधी केंद्र (Janaushadhi Kendra) सुरू करण्यासाठी ऑनलाईन अर्ज करता येणार आहे. सध्या हि प्रक्रिया सुरु आहे. (Central government plans to give employment and increase income of unemployed)
ग्रामीण भागात रोजगाराच्या संधी कमी आहेत अशात जनऔषधी केंद्रामुळे ग्रामीण भागात रोजगाराची संधी उपलब्ध होईल आणि बेरोजगारांना चांगली कमाई करता येईल.
याबाबत केंद्र सरकारने दिलेल्या माहितीनुसार देशातील 406 जिल्हे आणि 3579 तालुक्यात जन औषधी केंद्र सुरू करण्यासाठी अर्ज मागवण्यात येत आहेत. सध्या जनऔषधी केंद्र (Janaushadhi Kendra) सुरू करण्यासाठी ऑनलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत.
मार्च 2024 पर्यंत जनऔधषी केंद्राची संख्या वाढवून दहा हजार करण्याचे केंद्र सरकारचे लक्ष्य आहे. जनऔषधी केंद्रांची संख्या वाढल्यास नागरिकांना स्वस्तात औषधोपचार मिळणार.
जनऔषधी केंद्रामागे काय संकल्पना?
देशातील गरिब लोकांना महागडे औषधोपचार परवडत नाही. अशा लोकांसाठी जनऔषधी केंद्राच्या संकल्पनेचा उदय झालाय. जनऔषधी केंद्रांच्या माध्यमातून चांगल्या प्रतिची औषधे नागरिकांना स्वस्तात उपलब्ध करून दिली जाणार. येणाऱ्या काळात जनऔषधी केंद्राची संख्या वाढू नागरिकांना स्वस्त औषधोपचार आणि रोजगार मिळून देण्याचे सरकारचे उदिष्ट आहे.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.