केंद्रीय कोट्यातील आरक्षणामुळे वैद्यकीय प्रवेशासाठी चढाओढ

वैद्यकीय प्रवेश समितीने वैद्यकीय अभ्यासक्रमांच्या पदव्युत्तर पदवी प्रवेशाच्या जागांचा तक्ता जाहीर केला असून यामध्ये खुल्या प्रवर्गातील जागा गतवर्षीच्या तुलनेत ४२ टक्क्यांनी घटल्या आहेत.
Admission
AdmissionSakal
Updated on
Summary

वैद्यकीय प्रवेश समितीने वैद्यकीय अभ्यासक्रमांच्या पदव्युत्तर पदवी प्रवेशाच्या जागांचा तक्ता जाहीर केला असून यामध्ये खुल्या प्रवर्गातील जागा गतवर्षीच्या तुलनेत ४२ टक्क्यांनी घटल्या आहेत.

मुंबई - वैद्यकीय प्रवेश (Medical Admission) समितीने वैद्यकीय अभ्यासक्रमांच्या पदव्युत्तर पदवी प्रवेशाच्या जागांचा (Seats) तक्ता जाहीर केला असून यामध्ये खुल्या प्रवर्गातील जागा गतवर्षीच्या तुलनेत ४२ टक्क्यांनी घटल्या आहेत. तर दुसरीकडे केंद्रीय कोट्यात आता २७ टक्के ओबीसी (OBC) आणि १० टक्के आर्थिकदृष्ट्या अक्षक प्रवर्गाला असलेले आरक्षण (Reservation) लागू करण्यात आले असल्याने या शैक्षणिक वर्षात पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमांमध्ये प्रवेशासाठी मोठी चढाओढ पहायला मिळणार आहे.

केंद्रीय कोट्यामध्ये २०२० मध्ये खुल्या प्रवर्गात ६ हजार ५५६ जागा होत्या. ती संख्या २०२१मध्ये तीन हजार ८०९ पर्यंत पोहोचली आहे. तर वैद्यकीय पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी रुग्णालयांमध्ये ज्या जागा आहेत, त्यापैकी ५० टक्के जागा या नियमांनुसार केंद्रीय कोट्यासाठी राखीव ठेवाव्या लागतात. या जागांवर आतापर्यंत एससी आणि एसटी प्रवर्गासाठीचे आरक्षण असायचे इतर सर्व जागा खुल्या प्रवर्गातून भरल्या जात होत्या. याबाबत केंद्र सरकारने अध्यादेश आणून २७ टक्के ओबीसी आणि १० टक्के आर्थिकदृष्ट्या अक्षक प्रवर्गाला असलेले आरक्षण लागू केले. यामुळे काही अभ्यासक्रमांमध्ये खुल्या प्रवर्गासाठी जागाच शिल्लक राहणार नसल्याचा आक्षेप घेत सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती. या याचिकेची सुनावणी घेताना या प्रक्रियेवर स्थगिती आणण्यात आली होती. मात्र शैक्षणिक वर्ष संपत आले तरी प्रवेश प्रक्रिया पूर्ण न झाल्याने डॉक्टरांनी देशभर आंदोलन केले होते. तेव्हा सर्वोच्च न्यायालयाने यावर्षी प्रवेशासाठी हा अध्यादेश लागू करण्याचे सांगत प्रवेश प्रक्रिया पूर्ण करण्यास सांगितले होते आणि पुढील सुनावणी मार्च महिन्यात ठेवली आहे. यानुसार प्रवेश समितीने जागांचा तक्ता जाहीर केला आहे.

Admission
केईएम रॅगिंग प्रकरण : आरोपी विद्यार्थ्यांच्या आणि वरिष्ठांच्या विरोधात अट्रोसिटी

राज्यातील सार्वजनिक वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये ज्या अभ्यासक्रमांसाठी एक आकडी जागा आहेत तेथे निम्म्या जागा केंद्रीय कोट्यात जाणार असून खुल्या प्रवर्गासाठी आता जागाच नसतील असेही चित्र आहे. तर काही जागांवर फिरते आरक्षण असल्याने प्रत्येक प्रवर्गातील विद्यार्थ्याला प्रवेशासाठी दोन पेक्षा जास्त काळ प्रतीक्षा करावी लागणार आहे.

खुल्या प्रवर्गातील जागा

अभ्यासक्रम २०२० २०२१ कमी झालेल्या जागा

एमडी मेडिसीन ७३६ ३९४ ३४२

बालरोगतज्ज्ञ ४७५ २९५ १८०

ओबीजी ६१२ ३३५ २७७

एमएस सर्जन ६४१ ३८४ २५७

ईएनटी २०९ ११७ ९२

एकूण जागा ६५५६ ३८०९ २७४७

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.