पुणे : व्यावसायिक अभ्यासक्रमांसाठीच्या सामाईक प्रवेश परीक्षांचे (सीईटी) सुधारित वेळापत्रक घोषित करण्यात आले आहे. राज्य सीईटी कक्षातर्फे विविध पदवी व पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमांसाठी १५ सप्टेंबर ते १० ऑक्टोंबर या कालावधीत सामाईक प्रवेश परीक्षा घेण्यात येणार आहे, अशी माहिती उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी ट्वीटरद्वारे दिली आहे.
राज्यातील व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी उच्च व तंत्रशिक्षण विभागाच्या वतीने विविध प्रकारच्या सीईटी घेण्यात येतात. सामंत यांनी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पुण्यातच काही दिवसांपूर्वी सीईटीच्या संभाव्य तारखा घोषित केल्या होत्या. मात्र, परीक्षार्थींच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने परीक्षा केंद्रांची संख्या वाढविण्यासाठी प्रयत्न करण्यात आले. परिणामी सीईटीच्या तारखा पुढे ढकलल्याचे सामंत यांनी सांगितले होते. अखेरीस मंगळवारी विभागाने सीईटीचे सुधारित वेळापत्रक घोषित केले. सीईटी परीक्षांसाठी उपस्थित राहण्यासाठी विद्यार्थ्यांना लोकल प्रवासात मुभा देण्यात आल्याचेही सामंत यांनी स्पष्ट केले आहे.
सीईटीच्या तारखा....
अभ्यासक्रम ः सीईटीचे नाव ः तारीख
अभियांत्रिकी, औषधनिर्माणशास्त्र आणि कृषी पदवी आणि पदविका ः एमएचटी-सीईटी ः २० सप्टेंबर ते १ ऑक्टोंबर
मास्टर ऑफ कॉम्प्युटर ॲप्लिकेशन, हॉटेल मॅनेजमेंट, आर्किटेक्ट ः एमएएच-सीईटी ः १५ सप्टेंबर
मास्टर ऑफ एज्युकेशन,बॅचलर ऑफ एज्युकेशन ॲन्ड मास्टर ऑफ एज्युकेशन ः एमएएच-एमएड-सीईटी ः ३ ऑक्टोबर
मास्टर ऑफ फिजीकल एज्युकेशन (ऑफलाईन) ः एमएएच-एम.पी.ईडी.फिजीकल ः १६,१७ आणि १८ सप्टेंबर
बॅचलर ऑफ फिजीकल एज्युकेशन (ऑफलाईन) ः एमएएच-बी.पी.ईडी.फिजीकल ः ४,५,६ आणि ७ ऑक्टोबर
बॅचलर ऑफ लॉ (पाच वर्षे) ः एमएएच-एलएलबी-५इअर-सीईटी ः ३ ऑक्टोबर
बॅचलर ऑफ लॉ (तीन वर्षे ) ः एमएएच-एलएलबी-३इअर-सीईटी ः ६ व ७ ऑक्टोबर
मास्टर ऑफबिजनेस ॲडमिनिस्ट्रेशन ॲण्ड हॉटेल मॅनेजमेंट ः एमबीए/एमएमएस सीईटी ः १६,१७ आणि १८ सप्टेंबर
अधीक माहितीसाठी संकेतस्थळ ः
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.