SSC : कर्मचारी निवड आयोगाने (Staff Selection Commission, SSC) नुकत्याच विविध परीक्षा स्थगित केल्या आहेत. त्यानुसार आयोगाने एसएससी जीडी कॉन्स्टेबल (SSC GD Constable) परीक्षा अधिसूचनांसह सीजीएल आणि सीएचएसएल (CGL and CHSL Exam 2021) परीक्षाही पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे. (CGL And CHSL Exams Postponed)
सध्या देशात कोविड विषाणूचा वाढता प्रादुर्भाव पाहता, एसएससीने हा निर्णय घेतला आहे. ही भीषण परिस्थिती लक्षात घेता, एसएससीने CHSL, CGL आणि कॉन्स्टेबल GD अधिसूचनांची टियर वन परीक्षा पुढे ढकलली आहे. तसेच, या परीक्षांत सहभागी होणाऱ्या उमेदवारांनी अधिक माहितीसाठी आयोगाच्या संकेतस्थळावर ssc.nic.in भेट देऊन परीक्षेविषयी खातरजमा करावी.
21 आणि 22 मे 2021 रोजी होणारी एसएससी संयुक्त उच्च माध्यमिक टियर 1 परीक्षा पश्चिम बंगालमधील केंद्रांसाठी निवड झालेल्या उमेदवारांसाठी घेण्यात येणार होती. या व्यतिरिक्त एसएससीची ग्रॅज्युएट टियर 1 परीक्षा 2020 ही 29 मे ते 7 जून 2021 या कालावधीत आयोजित करण्यात आली होती. मात्र, त्यास आता आणखी मुदतवाढ देण्यात आली आहे.
आयोगाने 'या' परीक्षा केल्या रद्द
एसएससी सीएचएसएल टियर-1 2020
एसएससी सीजीएल टियर-1 2020
एसएससी जीडी कॉन्स्टेबल 2021 परीक्षा
दरम्यान, देशभरात कोरोना विषाणूच्या दुसर्या लाटेमुळे गंभीर परिस्थिती उद्भवली आहे. मात्र, याच पार्श्वभूमीवर आयोगाने एक महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे. आयोगाने सांगितले आहे, की एसएससी जीडी कॉन्स्टेबल, सीजीएल आणि सीएचएसएल परीक्षा 2021 च्या नवीन तारखांना योग्य वेळी जाहीर केले जाईल, असा दावा त्यांनी केला आहे. त्यामुळे उमेदवारांनी एसएससी 2021 च्या परीक्षांविषयी अधिक माहितीसाठी वेळोवेळी आयोगाच्या वेबसाइटला भेट देत राहणे गरजेचे आहे.
CGL And CHSL Exams Postponed
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.